घरताज्या घडामोडीSpaceXने रचला इतिहास! चार सामान्य नागरिकांना पाठवले अंतराळात

SpaceXने रचला इतिहास! चार सामान्य नागरिकांना पाठवले अंतराळात

Subscribe

बिझनेसमॅन एलन मस्क (Elon Musk) यांची कंपनी SpaceXने पहिल्यांदा सर्व सामान्य नागरिकांना बुधवारी रात्री अंतराळात रवाना करून इतिहास रचला आहे. कंपनीने पहिल्यांदा चार सर्वसामान्य नागरिकांना अंतराळात पाठवले आहे. या मिशनला इंसपिरेशन ४ (Inspiration4) असे नाव दिले गेले आहे. विशेष म्हणजे पृथ्वीच्या कक्षेत जाणारा हा पहिला नॉ प्रोफेशनल अंतराळवीरांचा ग्रुप आहे. नासाच्या फ्लोरिडा स्थित केनडी स्पेस रिसर्च सेंटरहून (Kennedy Space Center) फाल्कन-९ रॉकेटने उड्डाण घेतले. यावेळी ड्रॅगन कॅप्सूल ३५७ मैल म्हणजे सुमारे ५७५ किलोमीटर उंचावर पृथ्वीच्या कक्षेत जाईल.

ड्रॅगन कॅप्सूलतून या चार प्रवाशांना अंतराळात पाठवले आहे. हे चार प्रवासी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनहून १६० किमी उंच कक्षामधून तीन दिवस जगाला प्रदक्षिणा घालतील. यानंतर स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या कक्षेमध्ये पुन्हा प्रवेश करेल आणि फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर खाली पडतील.

- Advertisement -

मिशनची कमान इसाकमॅनकडे

या मिशनची कमान ३८ वर्षांच्या इसाकमॅनच्या हातात आहे. इसाकमॅन पेमेंट कंपनीचे फाउंडर आणि सीईओ आहेत. त्यांनी वयाच्या १६व्या वर्षी या कंपनीची सुरुवात केली होती. स्पेसएक्सचे संस्थापक एलन मस्क यांची अंतराळ पर्यटनाच्या जगात ही पहिलीच एंट्री आहे. यापूर्वी ब्लू ओरिजिन आणि व्हर्जिन स्पेस शिपने खासगी अंतराळ पर्यटनची सुरुवात करत उड्डाण केले होते.

- Advertisement -

इसाकमॅन व्यतिरिक्त या अंतराळ प्रवासामध्ये हेयली आर्केनोपण आहे. २९ वर्षीय हेयली कॅन्सरग्रस्त असून त्या सेंट जूड चिल्ड्रन रिसर्च रुग्णालयमध्ये फिजिशअन असिस्टंट आहे. हे मिशन लीड करणारे इसाकमॅनने रुग्णालयाला १०० मिलियन डॉलर एवढी रक्कम दान करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांना या मिशनमधून आणखीन १०० मिलियन डॉलर जमा करायचे आहेत.

या दोन जणांव्यतिरिक्त या अंतराळ प्रवासात अमेरिकेच्या हवाईदलातील माजी वैमानिक क्रिस सेम्ब्रोस्की आणि ५१ वर्षांचे शॉन प्रोक्टर सामील आहेत. ५१ वर्षीय प्रोक्टर एरिजोनाच्या एका कॉलेजमध्ये जियोलॉचे प्रोफेसर आहेत. हेयली अंतराळात जाणारी सर्वात कमी वयाची अमेरिकन नागरिक आहे.


हेही वाचा –  Gaganyaan Mission: अंतराळात कधी पाठवले जाणार गगनयान? केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -