घरताज्या घडामोडीMhada Recruitment 2021:कनिष्ठ लिपिक ते कनिष्ठ अभियंता पदासाठी 'मेगा'भरती, कुठे आणि कसा...

Mhada Recruitment 2021:कनिष्ठ लिपिक ते कनिष्ठ अभियंता पदासाठी ‘मेगा’भरती, कुठे आणि कसा कराल अर्ज ?

Subscribe

घराचे स्वप्न पुर्ण करणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अंतर्गत मोठ्या प्रमाणात सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. म्हाडाचे मुंबई महानगर क्षेत्रात तसेच विविध मंडळाअंतर्गत सुरू असलेल्या मेगा हाऊसिंग प्रकल्प पाहता मोठ्या प्रमाणात म्हणजे ५६५ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. सर्वाधिक जागा या कनिष्ठ लिपिक टंकलेखक या पदासाठी आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी असणार आहेत. म्हाडाने १७ सप्टेंबरपासून या सरळसेवा भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्याचे निश्चित केले आहे. (Mhada Recruitment 2021: Mhada to recruit junior clerk and junior engineer for upcoming affordable housing projects)

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध संवर्गात ५६५ रिक्त पदांसाठी सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. येत्या १७ सप्टेंबरपासून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज भरता येणार आहेत. कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता. कनिष्ठ अभियंता, सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक टंकलेखक, लघुटंकलेखक अशा विविध पदांसाठी ५६५ जागा या सरळसेवा भरतीअंतर्गत भरण्यात येणार आहेत. म्हाडाच्या संकेतस्थळावर रिक्त पदांबाबतचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

- Advertisement -

कुठे आणि कसा कराल अर्ज

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावर १७ सप्टेंबर सकाळी ११ वाजल्या पासून अर्ज उपलब्ध राहतील. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी संकेतस्थळावरील जाहिरात तपासावी, असे म्हाडाने स्पष्ट केले आहे. म्हाडाच्या जाहिरातीमध्ये भरतीसंदर्भात संवर्ग निहाय पदांचा तपशील देण्यात आला आहे. त्यामध्ये रिक्त पदांचा सविस्तर तपशील, शैक्षणिक अहर्ता, विहित वेतनश्रेणी, सामाजिक / समांतर / दिव्यांग आरक्षण, नियुक्तीच्या अटी व शर्ती तसेच प्रक्रिया इत्यादी माहिती देण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा अर्ज सादर करण्याच्या सूचनाही सविस्तर पद्धतीने देण्यात आल्या आहेत.

पदनाम                             पदसंख्या

कार्यकारी अभियंता (स्थापत्य)                       १३
उप अभियंता (स्थापत्य)                              १३
मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी       २
सहाय्यक विधी सल्लागार                            २
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)                           ११९
कनिष्ठ वस्तुशास्त्रज्ञ सहाय्यक                         ६
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक                       ४४
सहायक                                               १८
वरिष्ठ लिपिक                                          ७३
कनिष्ठ लिपिक – टंकलेखक                          २०७
लघुटंकलेखक                                         २०
भूमापक                                               ११
अनुरेखक                                              ७
———————————————–
एकूण ५६५

- Advertisement -

हेही वाचा – Mhada Lottery 2021 : 10 लाखांमध्ये मुंबईनजीक घर, म्हाडाची कुठे किती घरे ?


mhada recruitement

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -