घरदेश-विदेशOSCAR AWARD 2019 LIVE : सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अल्फान्सो क्वारोन

OSCAR AWARD 2019 LIVE : सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अल्फान्सो क्वारोन

Subscribe

कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा दिमाखदार सोहळा सुरु आहे. या पुरस्कार सोहळ्याला यंदा कोणीच होस्ट करत नाहीये.

९१ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे. कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा दिमाखदार सोहळा सुरु आहे. या पुरस्कार सोहळ्याला यंदा कोणीच होस्ट करत नाहीये. कॉमेडियन केविन हार्ट या पुरस्कार सोहळ्याला होस्ट करणार होते. मात्र पुरस्कार सोहळ्याच्या काही दिवस आधीच त्यांनी होस्ट करण्यास नकार दिला. त्यांच्या समलैंगिकतेच्याविरोधात आलेल्या ट्विट्सवरुन झालेल्या वादानंतर त्यांनी होस्ट करण्यास नकार दिला आहे. ऑस्कर पुरस्काराला होस्ट न करणए हे ऑस्करच्या इतिहासात ३ वर्षानंतर झाले आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये हॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले आहेत. यंदाचा ऑस्कर कोणत्या चित्रपटाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अल्फान्सो क्वारोन

रोमा चित्रपटासाठी अल्फान्सो क्वारोन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे. आतापर्यंत त्यांनी ४ ऑस्कर पटाकावले आहेत.

- Advertisement -


सर्वोत्कृष्ट चित्रपट – ‘ग्रीन बुक’

‘ग्रीन बुक’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे.

- Advertisement -


सर्वोत्कृष्ट अभिनेता – रॅमी मॅलिक

‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’ या चित्रपटाली सर्वोतकृष्ट अभिनयासाठी रॅमी मॅलिकला सर्वोत्कृष्ट अभिनेता ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे.


ओरिजनल स्क्रीनप्ले – ग्रीन बुक

ग्रीन बुक या चित्रपटाला ओरिजनल स्क्रीनप्ले या विभागात ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे.


ओरिजनल साँग – अ स्टार इज बॉर्न

अ स्टार इज बॉर्न या चित्रपटाने ओरिजनल साँग या गटात ऑस्कर अवॉर्ड जिंकला आहे.


सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म – स्कीन

स्कीन चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म विभागात ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे.


सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी – पीरियड : द एंड ऑफ सेंटेंस

पीरियड : द एंड ऑफ सेंटेंस या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी विभागात ऑस्कर अवॉर्ड जिंकला आहे.


सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म – बाओ

डोमी शी आणि बेकी कॉब यांच्या बाओ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्मचा ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे.


सर्वोत्तम सहअभिनेता- मेहेरशाला अली

‘ग्रीन बुक’ या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी अमेरिकन अभिनेते मेहेरशाला अलीला सर्वोत्तम सहअभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.


सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर – स्पायडर मॅन-इन टू द स्पायडर व्हर्स


भारतीय चित्रपट निर्माते गुनित मोंगानी डॉक्युमेंटरीसाठी पटकावला ऑस्कर अवॉर्ड.


सर्वोत्कृष्ट विदेशी भाषा विभाग – रोमा


सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन – ब्लॅक पँथर

हनाह बिचलर आणि जे हार्ट यांनी ब्लॅक पँथर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन विभागातील ऑस्कर अवॉर्ड जिंकला आहे. हनाह ही पहिली अफ्रीकन-अमेरिकन महिला आहे जिचे नाव या विभागात नॉमिनेट झाले होते. तिने अवॉर्ड मिळवून इतिहास रचला आहे.


सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटींग – दी बोहेमियन ऱ्हाप्सडी


सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- रोमा


सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री – ‘फ्री सोलो’

‘फ्री सोलो’ चित्रपटाने यंदाचा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री विभागातील ऑस्कर अवॉर्ड जिंकला आहे. ‘हेल काउंटी दिस मॉर्निंग’, दिस इवनिंग, माइंडिग द गॅप आणि आरबीजी जैसी हे चित्रपट नॉमिनेट झाले होते.


सर्वोत्कृष्ट वेशभूषा – ‘ब्लॅक पँथर’

सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी यंदाचा ऑस्कर अवॉर्ड ‘ब्लॅक पँथर’ या चित्रपटाला देण्यात आला आहे.


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – रेजिना किंग

रेजिना किंगला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर अवॉर्ड देण्यात आला आहे. ‘इफ बिएल स्ट्रीट कुड टॉक’ या चित्रपटासाठी तिला ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे. रिजनाचा हा पहिला ऑस्कर अवॉर्ड आहे.

View this post on Instagram

#Oscars Pro Tip: Bring a trained train handler.

A post shared by The Academy (@theacademy) on

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -