घरट्रेंडिंगधक्कादायक; विषारी हवेमुळे १ लाख चिमुरड्यांचा मृत्यू!

धक्कादायक; विषारी हवेमुळे १ लाख चिमुरड्यांचा मृत्यू!

Subscribe

'WHO'च्या धक्कादायक अहवालानुसार २०१६ या वर्षात विषारी हवेमुळे ५ वर्षांखालील १ लाख चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे.

दिवसागणीक देशातील वायु प्रदुषणाची तसंच हवेतील विषारी वायुंची पातळी वाढते आहे. राजधानी दिल्लीसह देशातील अन्य राज्यांना विषारी हवेच्या वाढत्या पातळीचा मोठा फटका बसला आहे. 

दिल्लीत का वाढतंय प्रदुषण?

वायु प्रदुषणामध्ये संपूर्ण देशात दिल्लीचा नंबर अव्वल आहे. याच भयानक प्रदुषणामुळे साधारण ऑक्टोबर–नोव्हेंबरमध्ये (थंडीच्या दिवसांत) दिल्लीत श्वास घेणं मुश्कील होऊन बसतं. दरवर्षी या काळात दिल्लीतील  शाळा, कॉलेज तसंच सरकारी आणि खासगी कार्यालयांना सक्तीची सुट्टी दिली जाते. या काळात दिल्लीला अक्षरश: गॅस चेंबरचे स्वरूप प्राप्त झालेले असते. ऑक्टोबर – नोव्हेंबरच्या दरम्यान हरियाणा, पंजाबमध्ये गहूच्या शेतीची तयारी केली जाते. त्यावेळी जमीनीच्या मशागतीपासून सर्व कामांना सुरूवात होते. त्यासाठी शेतीतमध्ये पालापाचोळा देखील जाळला जातो. परिणामी, मोठया प्रमाणावर धुरीचे लोट हे दिल्लीच्या दिशेने येतात. त्यामुळे दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर धुराचे साम्राज्य पाहायाला मिळते. वाढते शहरीकरण आणि वाहनांची प्रचंड संख्या देखील यामध्ये भर घालते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -