घरदेश-विदेशPadma Awards 2022 : सायरस पुनावाला, प्रभा अत्रेंचा पद्म पुरस्कारांनी सन्मान; 'या'...

Padma Awards 2022 : सायरस पुनावाला, प्रभा अत्रेंचा पद्म पुरस्कारांनी सन्मान; ‘या’ महान व्यक्तींच्या कार्याचा गौरव

Subscribe

75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना संबोधित केले. या संबोधनानंतर दरवर्षी देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्काराची घोषणा केली जाते. प्रजासत्ताक दिनी ज्या लोकांनी आपल्या क्षेत्रात देशाचे नाव अभिमानाने उंचावले त्यांना सरकारकडून या पद्म पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदाही या पुरस्काराची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यावेळी चार जणांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर 17 जणांना पद्मभूषण आणि 107 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये देशाच्या तिन्ही दलाचे प्रमुख अर्थात पहिले सीडीएस बिपीन रावत यांना वीरमरण आले. हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. आता त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी सरकारकडून त्यांचा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारने गौरवण्यात आला आहे. याशिवाय उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते कल्याण सिंह यांना मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचेही गेल्या वर्षी निधन झाले.

- Advertisement -

याशिवाय नीरज चोप्रा यांना पद्मश्री, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण, त्याचबरोबर कला क्षेत्रात राधेश्याम खेमका, प्रभा अत्रे यांना पद्मभूषण जाहीर करण्यात आला आहे. सायरस पुनावाला यांचा पद्मभूषण, प्रभा अत्रेंचा पद्मविभूषण पुरस्कारांने सन्मान करण्यात आला आहे. तर मायक्रोसोफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचाई या दोन्ही अमेरिकन पण मूळच्या भारतीय व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.

- Advertisement -

2022 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे – पद्मविभूषण पुरस्कार

CDS बिपीन रावत, कल्याण सिंग – पद्मविभूषण

सीरमचे संस्थापक सायरस पूनावाला – पद्मभूषण पुरस्कार

उद्योजक नटराजन चंद्रशेखरन – पद्मभूषण पुरस्कार

डॉ. हिम्मतराव बावसकर, सुलोचना चव्हाण, सोनु निगम –  पद्मश्री पुरस्कार

विजयकुमार डोंगरे, डॉ. भीमसेन सिंघल – पद्मश्री पुरस्कार जाहीर

दिवंगत डॉ. बालाजी तांबे – पद्मश्री

व्हिक्टर बॅनर्जी –  पद्मभूषण पुरस्कार

पद्म विभूषण पुरस्कार :

सीडीएस जनरल बिपीन रावत (मरणोत्तर)
प्रभा अत्रे – कला
कल्याण सिंह (मरणोत्तर)
राधेश्याम खेमका (मरणोत्तर)

पद्म भूषण पुरस्कार :

सायरस पुनावाला – व्यापार आणि उद्योग
नटराजन चंद्रशेखरन – व्यापार आणि उद्योग
सत्या नडेला
सुंदर पिचाई
गुलाम नबी आझाद

पद्मश्री पुरस्कार :

बाळाजी तांबे (मरणोत्तर)
विजयकुमार डोंगरे
सुलोचना चव्हाण
नीरज चोप्रा
डॉ. हिम्मतराव बावस्कर
सोनू निगम
अनिल राजवंशी
भिमसेन सिंगल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -