घरताज्या घडामोडीBMC Election 2022 : कमळ फुलणार की कोमेजणार निवडणुकीतच कळेल, महापौर पेडणेकरांचे...

BMC Election 2022 : कमळ फुलणार की कोमेजणार निवडणुकीतच कळेल, महापौर पेडणेकरांचे भाजपला प्रत्युत्तर

Subscribe

आगामी निवडणुकीत भाजपचे कमळ फुलणार की कोमेजणार हे कळेल. तसेच महापालिका निवडणुकीत कमळ फुलणार की धनुष्यबाण कमळाचा वेध घेणार हे निवडणुकीनंतरच केळेल अशी खोचक प्रतिक्रिया महापौर पेडणेकरांनी दिली आहे.

महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाल्या आहेत. मुंबई महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी भाजपकडून रणनिती आखण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये महापालिकेवर कमळ फुलवण्याचा संकल्प भाजपकडून करण्यात आला आहे. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. कमळ फुलणार की कोमेजणार निवडणुकीतच कळेल असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला दिला आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजप आमदार आशिष शेलार यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल केला आहे. महापालिका निडणुकीत शिवसेनेला चारी मुंड्या चीत करुन महापालिकेवर भाजपच कमळ फुलवण्याचा संकल्प केला असल्याचे भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कमळ फुलणार की कोमेजणार हे येणाऱ्या निवडणुकीतच कळेल असे मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, भाजपला हा पोटशूळ नाहीतर मुळव्याध झाला आहे. प्रत्येक पक्षाला तयारी करण्याचा अधिकार आहे. आगामी निवडणुकीत भाजपचे कमळ फुलणार की कोमेजणार हे कळेल. तसेच महापालिका निवडणुकीत कमळ फुलणार की धनुष्यबाण कमळाचा वेध घेणार हे निवडणुकीनंतरच केळेल अशी खोचक प्रतिक्रिया महापौर पेडणेकरांनी दिली आहे.

भाजप आमदार आशिष शेलार काय म्हणाले?

भाजप आमदार आशिष शेलार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती. सत्ताधारी शिवसेनेला चारी मुंड्या चित करण्यासाठी आणि मुंबईकरांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा या स्वरुपाचा सर्व ठोस कार्यक्रम ठरवला असल्याचे आशिष शेलार म्हणाले. आगामी कार्यक्रमांची तयारी सुरु करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजपच कमळ फुलणार हा संकल्प केला असल्याचे भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : मुंबई महापालिकेत केवळ भाजपचंच कमळ फुलणार, आशिष शेलारांचं मोठं विधान

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -