घररायगडकर्जत तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार, म्हशीवर केला हल्ला

कर्जत तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार, म्हशीवर केला हल्ला

Subscribe

यापूर्वीही तालुक्यातील ग्रामीण भागात अनेकदा बिबट्यांनी हल्ले करून पाळीव प्राणी ठार केले आहेत. तीनच महिन्यांपूर्वीही कर्जत तालुक्यातील खांडस येथे बिबट्याने शरद कटके यांच्या चार बकर्‍यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले होते.

कर्जत तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या बेकरे गावात शनिवारी रात्री संदेश कराळे यांच्या गोठ्यात बिबट्या शिरून बिबट्याने म्हशींवर हल्ला केला. म्हशींच्या ओरडण्याने कराळे कुटुंबीयांनी गोठ्याकडे धाव घेतल्याने बिबट्याने जंगलात धूम ठोकली. त्यामुळे पाळीव प्राण्यावर हल्ला करणार्‍या तसेच पुढील हल्ले टळण्यासाठी या बिबट्याला वन विभागाच्या अधिकार्‍यांनी तातडीने जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

यापूर्वीही तालुक्यातील ग्रामीण भागात अनेकदा बिबट्यांनी हल्ले करून पाळीव प्राणी ठार केले आहेत. तीनच महिन्यांपूर्वीही कर्जत तालुक्यातील खांडस येथे बिबट्याने शरद कटके यांच्या चार बकर्‍यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले होते. आता मागील काही दिवसापासून बेकरे परिसरातील काही शेळ्या अचानक गायब झाल्या. तसेच आजूबाजूच्या जंगल परिसरात अर्धवट खाल्लेले कुत्रे आढळून आले होते असे प्रत्यक्षदर्शी कराळे यांनी सांगितले. त्यामुळे येथे बिबट्याचा संचार असल्याचे बोलले जात होते. मात्र शनिवारी रात्री बिबट्या प्रत्यक्षात गावात शिरल्याचे दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी जखमी म्हशींची पाहणी करून पंचनामा केला आहे.

- Advertisement -

आम्ही ग्रामपंचायतींना , ग्रामस्थांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तसेच बिबट्याने एखादी अर्धवट खाल्लेली गाय, म्हैस आढळल्यास त्या गायीवर कोणतीही विषारी पावडर टाकू नका. ते आहे तेथेच तसेच ठेवा . उर्वरित मास बिबट्याला खाऊ द्यावे. मृत पाळीव प्राण्याची नुकसान भरपाई संबंधित मालकाला वन विभागाकडून दिली जाईल. आम्हाला बिबट्याच्या पायाचे ठसे, विष्ठा आढळून आली आहे.
-निलेश भुजबळ, वनक्षेत्रपाल, कर्जत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -