घरदेश-विदेशभाजप मुस्लिमांना काहीच देत नाही, हे माझे मत तुम्ही.... पद्मश्री विजेते रशीद...

भाजप मुस्लिमांना काहीच देत नाही, हे माझे मत तुम्ही…. पद्मश्री विजेते रशीद कादरींनी थेट पंतप्रधान मोदींना सांगितले

Subscribe

मला भाजप सरकारकडून पुरस्कार मिळेल याची जराही अपेक्षा नव्हती. मात्र माझा हा समज खोटा ठरवून तुम्ही मला हा पुरस्कार दिला त्यासाठी मी आपले आभार मानतो असे ते पंतप्रधान मोदींना म्हणाले. तेव्हा मोदींनीही त्यांचा हात हातात घेऊन मनमोकळे हसत त्यांना दाद दिली.

नवी दिल्ली – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी कर्नाटकमधील बिदर येथील रशीद अहमद कादरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले, यूपीए सरकारच्या काळात मी दहा वर्षे पुरस्कारासाठीचे सोपस्कार करत होतो. पण मला सन्मानित करण्यात आले नाही. भाजप सरकार मुस्लिमांना काही देत नाही हे माझे मत होते. मात्र तुम्ही माझी निवड करुन मला खोटं ठरवलं त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
भाजपच्या काळात पुरस्कार मिळणार नाही असे रशीद अहमद कादरी यांचे मत होते. मात्र त्यांची पद्म पुरस्करासाठी निवड झाली आहे. राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. (Padma Shri awardee Shah Rasheed Ahmed Quadari thanked PM Modi after he received the award)

बिद्री कलेतील योगदानाबद्दल पद्मश्री
रशीद अहमद कादरी हे बिद्री कलाकार आहे. बिद्री ही कर्नाटकातील पारंपरिक शिल्पकला आहे. या कलेत नवनवीन प्रयोग करण्यासाठी ते ओळखले जातात. कर्नाटकातील बिदर येथून ही कला सुरु झाली आहे. आता तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातही या कलेचा प्रसार झाला आहे. बिदर शहरापासून या कलेची निर्मिती झाली असल्यामुळे हिला बिद्री हे नाव मिळाले आहे. जस्त, तांबे, चांदी या धातूंचा वापर करुन ही हस्तकला केली जाते.

- Advertisement -

बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ५३ जणांचा पद्म पुरस्काराने सन्मान केला. यात अभिनेत्री रवीना टंडन, समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

- Advertisement -

पुरस्कार वितरणानंतर पंतप्रधानांनी सर्व सन्मानितांची भेट घेतली. यावेळी रशीद अहमद कादरी यांनी आपल्या भावना पंतप्रधानांजवळ व्यक्त केल्या. मला भाजप सरकारकडून पुरस्कार मिळेल याची जराही अपेक्षा नव्हती. मात्र माझा हा समज खोटा ठरवून तुम्ही मला हा पुरस्कार दिला त्यासाठी मी आपले आभार मानतो असे ते पंतप्रधान मोदींना म्हणाले. तेव्हा मोदींनीही त्यांचा हात हातात घेऊन मनमोकळे हसत त्यांना दाद दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -