घरदेश-विदेशParliament : संसद सुरक्षेच्या मुद्द्यावरून लोकसभेत आजही गोंधळ; अक्षम्य चुकीसाठी अध्यक्ष म्हणाले...

Parliament : संसद सुरक्षेच्या मुद्द्यावरून लोकसभेत आजही गोंधळ; अक्षम्य चुकीसाठी अध्यक्ष म्हणाले…

Subscribe

संसदेच्या सुरक्षेच्या चुकीवरून आजही विरोधकांनी दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. राज्यसभेत घातलेल्या गोंधळामुळे तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांचे निलंबन करण्यात आले तर राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज तहकूब केले.

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी (13 डिसेंबर) काही युवकांनी लोकसभा सभागृहात जाऊन गोंधळ घातला. यामुळे संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तर विरोधकांनी याच मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. असे असतानाच कालच्या गोंधळाचे आजसुद्धा पडसाद उमटत असून, विरोधकांनी आज घातलेल्या गोंधळामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले आहे. तर संसदेच्या सुरक्षेच्या अक्षम्य चुकीचे लोकसभा सचिवालयावर खापर फोडले आहे. (Parliament There is still confusion in the Lok Sabha over the issue of Parliament security For an unforgivable mistake the President said…)

संसदेच्या सुरक्षेच्या चुकीवरून आजही विरोधकांनी दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. राज्यसभेत घातलेल्या गोंधळामुळे तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांचे निलंबन करण्यात आले तर राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज तहकूब केले. यामुळे विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रचंड गदारोळ घातला. गुरुवारी लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी या मुद्द्यावर सरकारकडे उत्तरे मागितली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यादरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी लोकसभा सचिवालयाची आहे. बिर्ला म्हणाले की, आज पुन्हा संसदेच्या सुरक्षेवर चर्चा करू. संसद सचिवालयाच्या कामात सरकार कधीही हस्तक्षेप करत नाही. संसद परिसराची सुरक्षा ही लोकसभा सचिवालयाची जबाबदारी आहे. संसदेची सुरक्षेची जबाबदारी फक्त सरकारची नसून, हे आमचं कार्यक्षेत्र आहे, असेसुद्धा ओम बिर्ला यावेळी म्हणाले. मात्र तरीही विरोधी पक्षातील खासदारांकडून गोंधळ सुरूच होता. यामुळे लोकसभा अध्यक्षांनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केले.

- Advertisement -

हेही वाचा : Winter Session : ‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार, मंत्री धनंजय मुंडेंची माहिती

राजनाथ सिंह म्हणाले- ‘अशांना’ पास देऊ नये

संसदेत घुसखोरीच्या घटनेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, या प्रकरणाचा सर्वांनी निषेध केला पाहिजे. आपण सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. द्वेष आणि अराजकता पसरवणाऱ्यांना पास मिळत नाही हे पाहावे लागेल. जुन्या इमारतीतही कागद फेकण्याच्या आणि उड्या मारण्याच्या घटना घडल्या आहेत, याचीसुद्धा त्यांनी यावेळी आठवण करून दिली. मात्र सभागृहात घोषणाबाजी आणि गदारोळ करण्याची गरज नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Lok Sabha Survey : भाजपाला महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा मिळणार? सर्व्हेतून अंदाज व्यक्त

आतापर्यंत आठ जणांचे निलंबन

संसदेच्या सुरक्षेतील चुकीबाबत मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने आतापर्यंत आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. संसद भवनातील सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संबंधित हे लोक आहेत. या घटनेने 22 वर्षे जुन्या जखमा पुन्हा एकदा जीवंत झाल्या आहेत. 13 डिसेंबर 2001 रोजी संसद भवनावर हल्ला झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -