घरदेश-विदेशLok Sabha Survey : भाजपाला महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा मिळणार? सर्व्हेतून अंदाज...

Lok Sabha Survey : भाजपाला महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा मिळणार? सर्व्हेतून अंदाज व्यक्त

Subscribe

मुंबई : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीची सेमीफायनल भाजपाने जिंकली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांची फायनल देखील भाजपाच जिंकणार असल्याचे निष्कर्ष एका सर्वेक्षणातून समोर आले आहेत. यात एकट्या भाजपला 308 ते 328 जागा मिळू शकतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तथापि, 2019च्या तुलनेत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जागांमध्ये काही घट होऊ शकते, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

हेही वाचा – BJP’s CM : ‘अशा’ प्रकारे केली जाते भाजपाच्या मुख्यमंत्र्याची निवड, नड्डांनी दिली माहिती

- Advertisement -

आज निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला आणि आघाडीला किती जागा मिळू शकतात, त्याचा अंदाज टाइम्स नाऊ ईटीजी रिसर्चने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. सर्वेक्षणात महाराष्ट्रात काय परिस्थिती असू शकते, याचीही आकेडवारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. 2019च्या निवडणुकीत रालोआला मोठा विजय मिळाला होता. भाजपा आणि शिवसेनेला अनुक्रमे 23 आणि 18 जागा मिळाल्या होत्या. 2024च्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होणे, अपेक्षित आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण जागांची संख्या 48 आहे. टाइम्स नाऊ-ईटीजी रिसर्चच्या सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती (भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट) यांना 27 ते 31 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, महाराष्ट्रात INDIA म्हणजेच महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 16 ते 20 जागा मिळतील तर, इतरांना 1 ते 2 जागा मिळण्याची शक्यता सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation : “मराठ्यांना OBCमधून आरक्षण मिळाले तर…”, छगन भुजबळांना चिंता

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा कोण किती जिंकणार, याचा अंदाज वर्तविण्याबरोबरच रालोआ आणि मविआ यांना किती टक्के मते मिळतील? याचा अंदाजही सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकांत रालोआला 47 टक्के मते तर मविआला 41 टक्के मते मिळू शकतात, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. तर, इतरांना 11 टक्के मते मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेसोबत युती केली होती. त्यावेळी रालोआची एकूण मते 50 टक्क्यांहून अधिक होती. त्या तुलनेत आगामी लोकसभेत भाजपाच्या मतांची टक्केवारी काहीशी कमी होण्याचा अंदाज आहे. भाजपाने राज्यातील 26 जागांवर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. अशा स्थितीत गेल्यावेळच्या तुलनेत महाराष्ट्रात भाजपाला काही जागा कमी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : संसद भवनातील घुसखोरीवरून संजय राऊतांची सरकारवर टीका, नवीन संसदभवन…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -