घरताज्या घडामोडीआठव्या दिवशी पेट्रोल - डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा दर

आठव्या दिवशी पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा दर

Subscribe

गेल्या काही दिवसात पेट्रोलमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आज रविवारी पेट्रोल ०.६२ रुपयांनी वाढले असून डिझेल ०.६४ रुपयांनी वाढले आहे. तर सलग आठव्या दिवशी ही दरवाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसात पेट्रोलमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आज रविवारी पेट्रोल ०.६२ रुपयांनी वाढले असून डिझेल ०.६४ रुपयांनी वाढले आहे. तर सलग आठव्या दिवशी ही दरवाढ झाली आहे. यामुळे दिल्लीतील आजचा पेट्रोलचा दर हा ७५.७८ रुपये तर डिझेलचा दर ७४.०३ रुपये इतका झाला आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर ८२.१० रुपये आणि डिझेलचा दर ७२.०३ रुपये इतका झाला आहे. लॉकडाउनच्या काळात ८२ दिवस तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कुठलाच बदल केला नव्हता त्यामुळे आता या कंपन्यांनी सलग आठ दिवस इंधन दरवाढ केल्याचे सांगितले जात आहे.

देशातील चार महानगरांमधील आजचे दर

  • दिल्ली – पेट्रोल (७५.१६), डिझेल (७३.३९)
  • मुंबई – पेट्रोल (८२.१०), डिझेल (७२.०३)
  • कोलकाता – पेट्रोल (७७.०५), डिझेल (६९.२३)
  • चेन्नई – पेट्रोल (७८.९९), डिझेल (७१.६४)

राज्यातील प्रमुख शहरांतील आजचे दर

  • पुणे – पेट्रोल (८१.८६), डिझेल (७०.७३)
  • नागपूर – पेट्रोल (८२.६१), डिझेल (७२.५९)
  • नाशिक – पेट्रोल (८२.४९), डिझेल (७१.३५)
  • औरंगाबाद – पेट्रोल (८३.१८), डिझेल (७३.१२)

पेट्रोलच्या दरात ५९ पैशांनी वाढ

शनिवारी पेट्रोलच्या दरात ५९ पैशांनी वाढ झाली होती. त्यामुळे शहरात पेट्रोल प्रती लीटर ८२.१० रुपये झाले होते. तर डिझेल ७२.०३ रुपये झाले होते. दरम्यान, दिल्लीत पेट्रोलचा भाव ७५.१६ रुपये झाला होता तर डिझेल ७३.३९ रुपये झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – दोन महिन्याच्या कोरोनाग्रस्त बालकाचा मृत्यू; माहिती लपवण्याचा प्रयत्न


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -