घरदेश-विदेशनावात साधर्म्य असल्याने पॉझिटिव्ह रुग्णाला दिला डिस्चार्ज!

नावात साधर्म्य असल्याने पॉझिटिव्ह रुग्णाला दिला डिस्चार्ज!

Subscribe

हमिद आणि हनिफ या नावांच्या उच्चारात साधर्म्य आढळल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला रूग्णालयातून डिस्चार्ज दिल्याचा हा धक्कादायक प्रकार घडला.

देशभरात कोरोना व्हायरसचे संकट अधिक वाढताना दिसतंय. अशा परिस्थितीत कोरोनाची लक्षणं दिसणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करण्याचे प्रमाणही वाढतंय. मात्र आसाममधील डारंग जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नावातील साधर्म्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

असा घडला प्रकार

आसाममधील डारंग जिल्ह्यातील मंगलदोई रुग्णायतील ही घटना आहे. राज्य सरकारकडून आलेल्या कोरोनामुक्त १४ जणांची यादी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांसमोर वाचून दाखवली. या यादीतील दोन नावांमध्ये साधर्म्य असल्याने हा गोंधळ झाला.

- Advertisement -

कोरोनामुक्त झालेल्या १४ जणांच्या यादीत हमिद अली या रूग्णाचे नाव होते. ५ जूनपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी जेव्हा यादी वाचली तेव्हा दुसऱ्या हनीफ अली यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. हनीफ यांना ३ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला नव्हता. हमिद आणि हनिफ या नावांच्या उच्चारात साधर्म्य आढळल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला रूग्णालयातून डिस्चार्ज दिल्याचा हा धक्कादायक प्रकार घडला.

“कर्मचाऱ्यांनी चुकीचा निर्णय घेतल्याने हनिफ यांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर हनीफ रात्री नऊ वाजताच्या सुमारास रुग्णवाहिकेतून त्यांच्या घरी पोहोचले.”, असे ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, रुग्णालयातील प्रशासनाला या गंभीर चुकीची जाणीव झाली आणि हनीफ यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. ११ जून रोजी हनीफ यांची पुन्हा चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, मात्र हनीफ यांच्या घराला सील करण्यात आले असून त्यांच्या कुटुंबीयांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.


दोन महिन्याच्या कोरोनाग्रस्त बालकाचा मृत्यू; माहिती लपवण्याचा प्रयत्न
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -