घरताज्या घडामोडीBihar : भरधाव पिकअप उलटली, अन् कोंबड्यांसाठी लोकांची उडाली झुंबड

Bihar : भरधाव पिकअप उलटली, अन् कोंबड्यांसाठी लोकांची उडाली झुंबड

Subscribe

बिहारच्या बेगुसरायमध्ये कडाक्याच्या थंडीमध्येच कोंबड्यांनी भरलेल्या गाडीवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी रस्त्यातच पलटी झाली. परंतु कोंबड्या पाहून स्थानिक लोकांमध्ये लुटण्यासाठी एकच झुंबड उडाली. ज्यांच्या हातात जितक्या कोंबड्या आल्या त्या घेऊन लोकं सुसाट पळत सुटली. ही घटना काल मंगळवारी NH 28 वर घडली आहे.

कोंबड्यांनी भरलेली ही गाडी दलसिंगसराय येथून बेगुसरायकडे जात होती. वाटतेच वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाड्या रस्त्याच्या मधोमध पलटली. ही घटना घडल्यानंतर गाडीचे चालक आणि क्लिनर घटनास्थळावरून पसार झाले. चालक आणि क्लिनर पळून गेल्याचे पाहिल्यानंतर येथील स्थानिक लोकांची एकच गर्दी झाली. गाडीतून बाहेर आलेल्या कोंबड्या पकडण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली. तसेच ज्या कोंबड्या गाडीच्या आतील बाजूस होत्या. त्या कोंबड्या सुद्धा चोरण्याचा प्रयत्न लोकांनी केला.

- Advertisement -

शेकडो कोंबड्या चोरून लोकांनी काढला पळ 

दरम्यान, बघता बघता काही मिनिटांमध्येच शेकडो कोंबड्या चोरून लोकांनी पळ काढला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चाचपणी केली असता सर्वांनी कोंबड्या लुटून नेल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी रिकामे वाहन उचलत पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तसेच याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरूवात देखील केली आहे.

छत्तीसगढमध्ये घडली होती घटना –

काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारची घटना छत्तीसगढमधील बेमेत्रा जिल्ह्यातील नवागढ मार्गावर घडली होती. या ठिकाणी सुद्धा कोंबड्यांनी भरलेली गाडी पलटली. पिकअप वाहन कोंबड्यांना घेऊन बेमेतरामधून नवागढच्या दिशेने जात होती. परंतु रस्त्यातच एक मोठं वळण लागल्यामुळे अचानक कोंबड्यांनी भरलेली गाडी पलटी झाली. वाहनावार नियंत्रण न राहिल्यामुळे कोंबड्यांनी भरलेली गाडी पलटली. त्यानंतर त्या घटनास्थळी कोंबड्या पकडण्यासाठी स्थानिकांची झुंबड उडाली होती. चिकन बनवण्यासाठी अनेक ग्रामीण भागातील लोकांनी कोंबड्या चोरून नेल्या होत्या.

- Advertisement -

हेही वाचा : US Airport 5G : अमेरिकेत एअरपोर्टनजीक ५ रोलआऊटला ब्रेक ! एअर इंडियासह अनेक फ्लाईट्स रद्द


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -