घरदेश-विदेशपीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील तब्बल 19,500 कोटी रुपये

पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील तब्बल 19,500 कोटी रुपये

Subscribe

आज दुपारी 12:30 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधीत करतील या खास दिवशी केंद्रीय कृषी मत्री नरेंद्र सिंह तोमर सुद्धा उपस्थित असणार आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत 9 व्या हप्त्याचे सर्व शेतकरी वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.आज दुपारी 12:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरेंसिंगद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने संबधीत 9 व्या हफ्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची घोषणा करण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालयातर्फे जाहीर करण्यात येणाऱ्या घोषणेत म्हंटल आहे की, या हप्त्याचे  9.75 कोटी शेतकऱ्यांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी खात्यात आज 19 हजार 500 कोटी रुपये पाठवण्यात येणार आहे. या वेळी पंतप्रधात देशाला संबोधीत करणार आहे तसेच लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याची महत्वपुर्ण माहिती समोर येत आहे. किसान योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्याच्या कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येतात. तसेच ही रक्कम 2 हजारांच्या समान तीन हप्त्यात त्यांच्या बँक खात्यात टाकण्यता येते. या योजने अंतर्गत अत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांपेक्षा अधीक रक्कम शेतकऱ्यांना हस्तातंरीत करण्यात आली आहे.

आज दुपारी 12:30 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधीत करतील या खास दिवशी केंद्रीय कृषी मत्री नरेंद्र सिंह तोमर सुद्धा उपस्थित असणार आहे. यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 मे रोजी किसान योजनेचा आठवा हफ्ता जाहीर केला होता.

- Advertisement -

तुमच्या अकांऊटमध्ये पैसे आले की नाही असे करा चेक-

  • तुमच्या खात्यात पीएम किसान योजने अंतर्गत रक्कम जमा झाली आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी सर्वात आधी पीएम किसान योजनेच्या अधीकृत वेबसाइटवर जा.
  • वेबसाइटच्या डाव्या बाजूला असणाऱ्य फर्मर्स कॉर्नरवर क्लिक करा.
  • यानंतर पुढे एक पेज ओपन होईल यावर बेनिफिशियरी स्टेटस असे ऑप्शन देण्यात येईल यावर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन झाल्यावर तिथे तुमचा आधार कार्ड,फोन नंबर टाका.
  • संपुर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला स्टेटस दिसणार आणि तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे की नाही याची संपुर्ण माहिती मिळेल.

हे हि वाचा – मानवी हक्कभंगाचा धोका जास्त प्रमाणात पोलीस ठाण्यात होतो… मुख्य न्यायाधीश एन.वी रमन्ना

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -