घरदेश-विदेशPM Modi : अयोध्या, काशीचा विकास बघितल्यामुळे राहुल गांधी नाराज - मोदी

PM Modi : अयोध्या, काशीचा विकास बघितल्यामुळे राहुल गांधी नाराज – मोदी

Subscribe

गेल्या 10 वर्षात विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या लोकांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही काम करत आहोत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

वाराणसी : काशीचे तरुण व्यसनाधीन आहे. काशीतील तरुणांना अंमली पदार्थाचे व्यसनी म्हणून संबोधित केले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. काशी विश्वनाथ धामचे उद्धाटन झाल्यापासून रिक्षा चालक, फुल विक्रेते आणि होडीचालक यांच्या रोजगारात वाढ झाल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी यावेळी केली.

अयोध्येत प्रभू श्रीरामाचा विराजमान केल्याने 500 वर्षांचा वनवास संपला आहे. यानंतर पतंप्रधान मोदी हे वाराणसीत आले आहेत. राहुल गांधीवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेसच्या राघराण्यातील युवराज म्हणतात की, काशीचे तरुण व्यसनाधीन असून माझ्या काशीतील तरुणांना अंमली पदार्थाचे व्यसनी म्हणून संबोधित केले आहेत. यामुळे राहुल गांधीचा चेहरा समोर आला आहे. अयोध्या आणि काशीचे बदलले स्वरुप हे त्यांच्या रागाचे मुख्य कारण आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी राहुल गांधीवर केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Raj Thackeray : मनसेच्या इशाऱ्यानंतर निवडणूक आयोग नरमले; मुंबईतील शिक्षकांना कामातून वगळले

यूपीच्या मुलांना अंमली पदार्थाचे व्यसनी म्हणतात. या तरुणीने विकसित यूपी बनवण्यात व्यस्त असून इंडियाने यूपीतील तरुणांचा केलेला अपमान कधीही विसरता येणार नाही, असे पंतप्रधान मोदींने म्हणाले. पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात काशीला 45 हजार कोटींच्या योजना दिल्या आहेत. विकसित भारताच्या संकल्पाने देशवासीयांना पंतप्रधान मोदींनी जोडल्याची त्यांनी ओळख आहे, असे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Congress : भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात, योग्य वेळी हातोडा मारू, नाना पटोले यांचा दावा

गरीब आणि वंचितांसाठी योजना आखल्या

पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या 10 वर्षात विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या लोकांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही काम करत आहोत. यापूर्वी गरिबांना सर्वात शेवटचे मानले जायचे, आज सर्व योजना त्यांच्यासाठी बनवल्या जात आहेत. कोरोनाच्या इतक्या मोठ्या संकटात आम्ही 80 कोटी गरीब लोकांसाठी मोफत रेशनची व्यवस्था केली. आम्ही स्वच्छ भारत योजना मोहीम सुरू केली, प्रत्येक कुटुंबाला शौचालयाचा लाभ दिला. विशेषत: दलित माता-भगिनींना याचा फायदा झाला, कारण त्यांना उघड्यावर शौचालयास जावे लागत होते. शुद्ध पाण्यासाठी जल जीवन अभियान सुरू आहे. 11 कोटींहून अधिक घरांना पाईपने पाणीपुरवठा करण्यात आला. आयुष्मान कार्ड बनवले आहेत. जन धन खाती उघडली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -