घरमहाराष्ट्रनागपूरCongress : भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात, योग्य वेळी हातोडा मारू, नाना...

Congress : भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात, योग्य वेळी हातोडा मारू, नाना पटोले यांचा दावा

Subscribe

जागावाटपावरून महाविकास आघाडीत कसलेही मतभेद वा गोंधळ नसून गोंधळ हा महायुतीत आहे. त्यांच्यात काहीच ताळमेळ नाही. आघाडीतील सर्व मित्र पक्षांशी चर्चा सुरू असून, बहुतांश जागा निश्चित झाल्या आहेत. लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. भाजपला सत्तेतून हद्दपार करणे हाच महाविकास आघाडीचा मुख्य उद्देश आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

मुंबई : भाजपकडून तोडफोडीचे राजकारण सुरू असले तरी भाजपचे अनेक नेते काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी (23 फेब्रुवारी) नागपूरमध्ये बोलताना केला. सत्तेच्या जोरावर त्यांना जेवढा खेळ खेळायचा आहे. तेवढा त्यांना खेळू द्या. आम्ही एकच हातोडा मारू मग त्यांना कळेल, असा इशाराही पटोले यांनी दिला. (Congress Many BJP leaders are in touch with us we will hammer at the right time claims Nana Patole)

जागावाटपावरून महाविकास आघाडीत कसलेही मतभेद वा गोंधळ नसून गोंधळ हा महायुतीत आहे. त्यांच्यात काहीच ताळमेळ नाही. आघाडीतील सर्व मित्र पक्षांशी चर्चा सुरू असून, बहुतांश जागा निश्चित झाल्या आहेत. लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. भाजपला सत्तेतून हद्दपार करणे हाच महाविकास आघाडीचा मुख्य उद्देश आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

राज्यात महायुतीचे वातावरण कुठेच नाही ते फक्त जाहिरातीतच दिसत आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरु आहे. परंतु जनभावना मात्र वेगळ्या आहेत. निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. बारामतीच्या जागेवरही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडून येणार आहे. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष माध्यमातून वातावरण निर्मिती करत आहेत. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे, असे पटोले म्हणाले.

हेही वाचा : Manohar Joshi : मनोहर जोशी पंचत्वात विलीन; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

- Advertisement -

अजित पवार यांनी बारामतीत बिर्याणीचा कार्यक्रम ठेवला होता. परंतु ते शरद पवारांविरोधात बोलायला लागले की, लोक निघून गेले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात तुतारी हा भाजपच्या तानाशाहीला संदेश आहे. या तुतारीत अत्याचारी व्यवस्थेला संपवण्याची क्षमता आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म दिला. परंतु या अत्याचारी व्यवस्थेने त्यांचा पक्ष आणि घड्याळ चिन्हही चोरून घेतले, अशी टीका पटोले यांनी केली.

हेही वाचा : Maratha Reservation : वैयक्तिक वादात सरकारला ओढू नये; जरांगे- बारसकर वादावर शिंदे गटाची भूमिका

विधानसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबई वगळता राज्यातील 288 पैकी 252 विधानसभा मतदारसंघात निरीक्षक नेमले आहेत. या निरीक्षकांवर आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचार यंत्रणा राबविणे तसेच घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांशी समन्वय आणि संपर्क साधण्याची जबाबदारी असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -