घरदेश-विदेशPM Modi's J&K Visit : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये बॉम्बस्फोट; सुरक्षा व्यवस्था...

PM Modi’s J&K Visit : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये बॉम्बस्फोट; सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क

Subscribe

सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सांबा आणि आसपासच्या परिसरात बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे, सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाण सध्या मर्यादित सामान्य लोकांना जाऊ दिले जातेय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत मात्र त्यांच्या दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीर एक बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. जम्मूमधील प्रताप सिंग पुरा ललियाना गावातील शेतात हा स्फोट झाल्याची महिती समोर आली आहे.

पंतप्रधान मोदी आज जम्मू-काश्मीरमधील पल्ली, सांबा (Samba) येथे पंचायत परिषदेला संबोधित करणार आहेत. हा स्फोट शेताच्या मधोमध झाला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीच्या ठिकाणापासून केवळं आठ किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाला आहे. स्फोटाचा आवाज ऐकून पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बिश्नाहच्या प्रताप सिंह पुरा ललियाना गावात रविवारी पहाटे ४.२५ च्या सुमारास मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला. स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घराबाहेर पडले आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. संशयित स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की शेजारी राहणाऱ्या लोकांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट शेताच्या मध्यभागी झाला. या स्फोटानंतर जमिनीत खोल खड्डा तयार झाला आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून हा संशयास्पद स्फोट कसा झाला, याचा तपास केला जात आहे.

सध्या काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, उल्का पडल्यामुळे हा स्फोटही झाला असावा. मात्र, संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली आहे. आजपासून पल्ली गावात राष्ट्रीय पंचायत दिनानिमित्त पंतप्रधान देशातील सर्व पंचायतींना आभासी पद्धतीने संबोधित करणार आहेत. अशा परिस्थितीत रॅलीच्या ठिकाणी आणि जवळपासच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आधीच वाढवण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान जम्मूमधीस सुंजवाव येथे दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीनंतर आता पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली आहे. त्यांच्या रॅलीसाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे बहुस्तरीय सुरक्षा घेराखाली ही रॅली काढली जाणार आहे. तसेच पाकिस्तानी ड्रेन घुसण्याची शक्यता लक्षात घेता कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सांबा आणि आसपासच्या परिसरात बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे, सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाण सध्या मर्यादित सामान्य लोकांना जाऊ दिले जातेय. कार्यक्रमास्थळी जाणाऱ्या सर्व रस्त्त्यांवर चेक पोस्ट वाढवण्यात आल्या आहे. महामार्ग आणि त्याच्या लगतच्या रस्त्यांवरील वाहने आणि लोकांना कसून तपासणी केल्यानंतरच पुढे जाण्याची परवानगी दिली जात आहे.


Kirit Somaiya Car Attack : पोलीस संरक्षणात ही गुंडगिरी सुरु, जशास तसं उत्तर देणार; सोमय्यांवरील हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -