घरदेश-विदेशBuddha Purnima: कोरोना महामारीत गौतम बुध्दांचं आयुष्य हे दीपस्तंभासारखं -पंतप्रधान मोदी

Buddha Purnima: कोरोना महामारीत गौतम बुध्दांचं आयुष्य हे दीपस्तंभासारखं -पंतप्रधान मोदी

Subscribe

बुध्द पौर्णिमेनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संबोधित केलं. यावेळी त्यांनी कोरोना सारख्या संकटकाळात गौतम बुद्धांनी सांगितलेली तत्व ही मार्गदर्शक तत्त्व म्हणून त्यांचा उपयोग होतोय, असे सांगितले. कोरोनाच्या महामारीत गौतम बुध्दांचं आयुष्य हे एका दिपस्तंभाप्रमाणे सर्वांना मार्गदर्शन करत आहे, असं देखील मोदींनी संबोधन करताना सांगितलं आहे. जगभर तिरस्कार पसरत असताना गौतम बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अनुसरण्याची वेळ आली आहे, असेही बौद्ध पोर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

निसर्गाचा आदर करणं ही बुद्ध यांनी दिलेली शिकवण अतिशय महत्वाची असून सध्याच्या घडीला सर्व देशवासियांनी ती आचरणात आणली पाहिजे. यासह ज्या लोकांचा मानवतेवर विश्वास, श्रद्धा आहे त्या लोकांनी एकत्र येऊन संपूर्ण मानव जातीचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असायला हवं, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

- Advertisement -

वैशाख बौद्ध पोर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जगभरातील प्रमुख कार्यकर्ते भिक्खुंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना महामारीदरम्यान, दुसऱ्या लाटेला सर्वच सामोर जात आहेत. वर्षभरात कोरोनावर लस शोधणाऱ्या वैज्ञानिकांचा सार्थ अभिमान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी जगभरातील ५० पेक्षा जास्त बौद्ध भिक्खुंनी या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला होता. यावेळी निसर्गाचा आदर करणं, पृथ्वीचे संवर्धन ही बुद्ध यांनी दिलेली शिकवण अतिशय महत्त्वाची आहे. कोरोना संकटात सगळ्यांनीच बुध्दांची शिकवण आचरणात आणली पाहिजे. जगभरातल्या मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी असलेला भारतही शाश्वत विकासाच्या मार्गावर चालत आहे याचा अभिमान असल्याचेही पंतप्रधान यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

 

 

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -