घरताज्या घडामोडीPM Modi Speech in Lok Sabha : तुकडे-तुकडे गँगचे नेतृत्व काँग्रेसकडे, पंतप्रधान...

PM Modi Speech in Lok Sabha : तुकडे-तुकडे गँगचे नेतृत्व काँग्रेसकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसला सातत्याने अपयश येत असल्यामुळे त्याच्यांमध्ये विभाजनवादी मानसिकता काँग्रेसच्या डीएनएमध्ये घुसली आहे. देशात फुटीरतावाद निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा या नितीला काँग्रेसने आपले चरित्र बनवलं आहे. त्यांची निती काँग्रेसच्या डीएनमध्ये भिनल्याने ते आता तुकडे तुकडे गँगचे नेतृत्त्व करीत आहेत, असा घणाघात नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केलाय.

देशात फुटीरतावाद निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून

काँग्रेसच्या फुटीरतावादी भूमिकेवर मोदींनी जोरदार टीका केली. काँग्रेसला सातत्याने जनता नाकारत असल्याने त्यांना नैराश्य आलं आहे. या नैराश्यामधूनच त्यांची विध्वंसक वृत्ती वाढीस लागली आहे. या विध्वंसक वृत्तीमधूनच देशात फुटीरतावाद निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. अर्थात इंग्रजांची फोडा आणि राज्य करा ही निती काँग्रेसच्या डीएनमध्ये भिनल्याने आपल्या राजकारणासाठी फुटीरतावादासोबत प्रोत्साहन देणे हा काँग्रेसचा इतिहास आहे, असं मोदींनी म्हटलंय.

- Advertisement -

जनतेच्या भावना भडकाविण्याचे काम

देशातील जनतेच्या भावना भडकाविण्याचे काम काँग्रेसने केले आहे. देशाला तोडण्याचे कारस्थान यशस्वी झाले नसल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. काँग्रेस पक्षाकडून देशाच्या घटनेमध्ये राष्ट्र हा उल्लेखच नसल्याचा दावा करण्यात आला. मात्र, यामुळे लोकशाहीच्या सर्वाच्च सभागृहाचा अवमान झाला आहे. राष्ट्र ही केवळ सरकारी व्यवस्था असल्याचे आम्ही मानत नाही, राष्ट्र ही जिवंत संकल्पना आहे, असा टोला मोदींनी लगावला आहे.


हेही वाचा : PM Modi Speech in Lok Sabha : पंतप्रधानांनी केलेल्या बेजबाबदार वर्तनामुळेच देशात कोरोनाचे रूग्ण वाढले – नाना पटोले

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -