घरदेश-विदेशPM Modi : नव्या संसदेचे श्रेय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना, पंतप्रधान मोदी...

PM Modi : नव्या संसदेचे श्रेय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना, पंतप्रधान मोदी म्हणाले…

Subscribe

नवी दिल्ली : केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या प्रस्तावावर भाषण केले. यावेळी त्यांनी 17 व्या लोकसभेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांबाबत माहिती देताना खासदारांचे आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे विशेष आभार मानले. तर नवीन संसदेचे श्रेयही त्यांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आहे. 17 व्या लोकसभेमधील हे 15 वे अधिवेशन आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अंतरिम असून 17 वी लोकसभा लवकरच विसर्जित करण्यात येणार आहे. (PM Narendra Modi credited Lok Sabha Speaker Om Birla for the new Parliament)

हेही वाचा… PM Modi : मागील पाच वर्षं सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनाची; जगाने भारताची ताकद पाहिली

- Advertisement -

आजच्या (ता. 10 फेब्रुवारी) भाषणांत पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या इमारतीविषयी बोलताना म्हणाले की, नव्या संसदेबाबत सर्वांनी याआधी खूपवेळा चर्चा केली. पण कोणीच नवे संसद तयार केले नाही. पण तुमच्या (लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला) नेतृत्त्वाने निर्णय घेतला आणि निर्णयाला पुढे पाठवले आणि परिणामी देशाला नवे संसद भवन प्राप्त झाले आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेचेही श्रेय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले. तर, मी अध्यक्षांप्रती हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो असे म्हणत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचे वारंवार मानले. ओम बिर्ला सतत हसतमुख चेहऱ्याने सामोरे गेले. सभागृहात काहीही झाले तर त्यांचा चेहरा सतत हसतमुख असत. प्रत्येक परिस्थिती संतुलित राहून त्यांनी निष्पक्षपणे नेतृत्त्व केले.

तसेच, यावेळी डिजिटलायझेशनवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रत्येकाला आता आधुनिक तंत्रज्ञानाची सवय झाली आहे. ही कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली आहे. संयुक्त प्रयत्नांमुळे 17व्या लोकसभेची उत्पादकता जवळपास 97 टक्के झाली आहे. ही आनंदाची बाब आहे. पण मला विश्वास आहे की आज आपण 17व्या लोकसभेच्या शेवटाकडे वाटचाल करत असताना, 18व्या लोकसभेची सुरुवात आपण नेहमी 100 टक्क्यांहून अधिक उत्पादकता क्षमता बाळगून करू. असा नवा संकल्पच आपण 18 व्या लोकसभेसाठी करू, असेही मोदींकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -