घरमहाराष्ट्रBJP Vs Thackeray : 'त्यांच्या' मानसिक आरोग्यावर काय बोलणार? बावनकुळेंचा टोला

BJP Vs Thackeray : ‘त्यांच्या’ मानसिक आरोग्यावर काय बोलणार? बावनकुळेंचा टोला

Subscribe

मुंबई : राज्यात एकापाठोपाठ एक गोळीबाराच्या घटना घडत आहेत. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी फडणवीस यांचा ‘मनोरुग्ण’ असा उल्लेख केला. त्यांच्या मानसिक आरोग्यावर काय बोलणार? असा सवाल करत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे.

हेही वाचा – Nikhil Wagle : गुंड केवळ मंत्रालयात नाहीत तर आता…, वागळे हल्लाप्रकरणी दानवेंची टीका

- Advertisement -

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर बोलण्यासाठी तसेच गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. याआधी मी त्यांना उद्देशून फडतूस शब्द वापरला होता, पण आता तोही तोकडा पडतो आहे. महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री मिळाला आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

- Advertisement -

यावर आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. मुर्खांच्या नंदनवनात वावरणारे सदैव मनोरुग्णालयातच असल्यासारखे वागतात. परिणामी त्यांच्या संगतीत न राहणे पसंत करून सहकारी सोडून जातात. आपली मानसिक अवस्था आम्ही समजू शकतो. पण, त्याचा अर्थ इतरांनाही तसेच समजण्याची गरज नसते, असा पलटवार बावनकुळे यांनी केला आहे.

हेही वाचा – Maharashtra Crime : …तरी गुंडगिरी कशी थांबणार? आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल

ज्यांनी अडीच वर्षं ‘वसुलीची गॅरंटी’ दिली, त्यांनी ‘मोदी गॅरंटी’वर बोलायचे नसते. आमची उद्धव ठाकरे यांना विनंती आहे, या मानसिक धक्क्यातून स्वत:ला सावरा आणि मनसुख हिरेन, उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटकं, वाझे, 100 कोटींची वसुली, पत्राचाळीतून मराठी माणसांची लूट, सोशल मीडियातून लिहिणार्‍यांना घरात बोलावून मारहाण, कोविड काळात पत्रकारांना जेल, याकूबच्या कबरीवर रोषणाई, पालघर साधू हत्याकांड, खिचडी घोटाळा, इतकी वर्षं मुंबईकरांची लूट, सत्ता टिकविण्यासाठी दिल्लीत मुजरे करणे यावर एकदा मनसोक्त बोला. त्यातच त्यांच्या या अवस्थेचा उपचार दडला आहे, असा टोला त्यांनी लगावला. बाकी आमची शब्दसंपदा मोठी आहे. पण, आमची ती संस्कृती नाही. ज्यांना संवेदनशील मन नाही, त्यांच्या मानसिक आरोग्यावर आम्ही काय बोलणार? असेही त्यांनी सुनावले आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : ‘राज्यपालांकडून आम्हाला अपेक्षा नाही; सरकार हटवा राष्ट्रपती राजवट लागू करा’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -