घरदेश-विदेशपंतप्रधान मोदींची मोठी घोषणा सोशल मीडियाचा सोडणार?

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा सोशल मीडियाचा सोडणार?

Subscribe

‘मोदीजी ट्विटर नको, द्वेष सोडा. -राहुल गांधी, काँग्रेस नेते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अवघ्या देशवासीयांना धक्का देणारी घोषणा केली. येत्या रविवारी आपण फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरील अकाऊंट सोडून देण्याच्या विचारात आहेत, असा संदेश त्यांनी ट्विटरद्वारे दिला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या संदेशामुळे देशभरात खळबळ माजली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावर लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ट्विटरवरील नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या 50 मिलियन इतकी झाली. म्हणजेच 5 कोटींचा आकडा पार झाला आहे. ट्विटरवर सर्वाधिक जास्त फॉलोअर्स असलेल्या राजकीय नेत्यांच्या लिस्टमध्ये नरेंद्र मोदी तिसर्‍या स्थानकावर आहेत.

- Advertisement -

तर फेसबुकवरही त्यांचे 44 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर मोदींचे 35.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तसेच युट्युबवरील 4.5 दशलक्ष सबस्क्रायबर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या संदेशानंतर राजकीय पातळीवरही प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेकांना अचंबित करणार्‍या या निर्णयाचे देशभरात तर्कवितर्क लढवले जावू लागले आहेत.
सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात जो वाद सुरू आहे त्यातच दिल्लीत दंगल झाली. त्यामागे सोशल मीडियातून जे संदेश आणि व्हिडिओ व्हायरल होत होते ते कारणीभूत होते, त्याचा पंतप्रधानांना उबग आला असावा, असा तर्क काही जण लावत आहेत. जेणे करून या माध्यमातून पंतप्रधान अवघ्या देशवासीयांना सोशल मीडियाच्या वापराबाबत अंतर्मुख होण्याचा संदेश देत आहेत, असेही काही जण म्हणत आहेत. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘मोदीजी ट्विटर नको, द्वेष सोडा’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मोदींच्या यशात सोशल मीडियाचा मोठा वाटा
नरेंद्र मोदी यांना २०१४ साली भाजपने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर स्वत: मोदींनी सोशल मीडियाचा वापर आपल्या प्रचारासाठी मोठ्या खुबीने केला होता. त्यांनी भाजपचा आयटी सेल सुरू केला, असे म्हटले जात होते. त्यावरून अविरतपणे मोदींचा प्रचार केला जात होता. नरेंद्र मोदी स्वत:हून सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाच्या जनतेच्या संपर्कात होते. त्यावेळी नरेंद्र मोदी आणि भाजपच्या आयटी सेलचा सोशल मीडियावर इतका मोठा धमका होता की, त्यामुळेच भाजपला प्रथमच केंद्रात स्वत:चे बहुमत मिळाले असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही ते सोशल मीडियावर फार लोकप्रिय होते. सोशल मीडियाद्वारे मोदींना मिळालेली प्रसिद्ध आणि यश पाहून अनेक नेत्यांनी स्वत: चे सोशल मीडिया अकाऊंट तयार केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -