घरक्रीडासुशील मुरकर ठरला परळ श्री चा विजेता

सुशील मुरकर ठरला परळ श्री चा विजेता

Subscribe

फिजीक स्पोर्ट्समध्ये शुभम कांडूला अजिंक्यपद

प्रभादेवीच्या स्वामी समर्थ व्यायामशाळेचा शरीरसौष्ठवपटू सुशील मुरकर मनीष आडविलकर्स परळ श्री स्पर्धेचा विजेता ठरला. त्याने हा किताब मिळवताना दिपक तांबीटकर, गणेश पेडामकर यांसारख्या दिग्गज शरीरसौष्ठवपटूंना मागे टाकले. बाल मित्र जिमच्या शुभम कांडूने फिजीक स्पोर्ट्स गटात, तर डी. एन. फिटनेसच्या हितेश चव्हाणने दिव्यांगांच्या गटात बाजी मारली.

परळच्या कामगार मैदानात मुंबई शहरच्या शरीरसौष्ठवपटूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या परळ श्री स्पर्धेत ५५ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला. शनिवारी रात्री झालेल्या मुंबई श्री स्पर्धेत सुशील मुरकरला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, त्याने परळ श्री स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत ही स्पर्धा जिंकली. त्याला रॉयल एनफिल्ड देऊन गौरविण्यात आले. फिजीक स्पोर्ट्स प्रकार हा खुल्या गटासाठी असल्यामुळे या गटात ५१ स्पर्धक सहभागी झाले.

- Advertisement -

मुंबई श्री स्पर्धेत विजेता ठरलेल्या अरमान अन्सारीला परळ श्रीच्या फिजीक स्पोर्ट्स प्रकारात पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. माजी महाराष्ट्र श्री आणि आयोजक मनीष आडविलकर यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या फिजीक स्पोर्ट्स प्रकारात १० ऐवजी १५ खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.

निकाल-

परळ श्री शरीरसौष्ठव अव्वल पाच : १] सुशील मुरकर ( स्वामी समर्थ व्यायामशाळा), २] दिपक तांबीटकर (रिगस जिम), ३] गणेश पेडामकर (गुरूदत्त जिम), ४] गणेश उरणकर (वैयक्तिक), ५] आशीष लोखंडे (रिसेट जिम).

- Advertisement -

फिजीक स्पोर्ट्स अव्वल पाच : १] शुभम कांडू (बाल मित्र व्यायामशाळा), २] विजय हाप्पे ( परब फिटनेस), ३] अली अब्बास (एस. पी. फिटनेस), ४] यश अहिरराव ( फिटनेस हाऊस), ५] अरमान अन्सारी (मॉर्डन फिटनेस).

परळ श्री दिव्यांग स्पर्धा : १] हितेश चव्हाण (डी.एन. फिटनेस), २] अक्षय शेजवळ (समर्थ जिम), ३] प्रथमेश भोसले (माँसाहेब जिम), ४] मुरूगन नाडार (विशाल फिटनेस), ५] सचिन गिरी (आर. के. फिटनेस).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -