घरदेश-विदेशRaisina Dialogue 2021: आजपासून सहाव्या रायसिना संवादाला सुरुवात; पंतप्रधान मोदी करणार संबोधन

Raisina Dialogue 2021: आजपासून सहाव्या रायसिना संवादाला सुरुवात; पंतप्रधान मोदी करणार संबोधन

Subscribe

या संवादात जगभरातील साधारण ५० देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे १५० प्रतिनिधी सहभाग घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘रायसिना संवाद’च्या (Raisina Dialogue) ६ व्या आवृत्तीचे ऑनलाईन उदघाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे उद्धाटन करणार असून या संवादात जगभरातील साधारण ५० देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे १५० प्रतिनिधी सहभाग घेणार आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता परराष्ट्र मंत्रालयाने हा कार्यक्रम व्हिडिओ काँन्फरन्सिंगद्वारे १३ ते १६ एप्रिल या दरम्यान घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. हा कार्यक्रम भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्जर्व्हर रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे.

यंदाच्या रायसिना डॉयलॉगची संकल्पना “#ViralWorld: Outbreaks, Outliers and Out of Control” अशी आहे. आजपासून सुरू होणाऱ्या या संवादात फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, रवांडा, डेनमार्क, जपान, सिंगापूर या देशांसोबत एकूण १४ देशांचे मंत्री सहभाग घेणार आहेत. यासोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल सहभागी होणार आहे. याव्यतिरिक्त पोर्तुगाल, मालदीव, जपान आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसह बरेच नेते व अधिकारी या संवादात भाग घेणार असल्याची माहिती मिळतेय.

- Advertisement -

 

- Advertisement -

‘रायसिना डायलॉग’ म्हणजे नेमकं काय?

भारतात परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्जर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पहिल्यांदा याची सुरुवात केंद्र सरकारने २०१६ मध्ये केली होती. त्यानंतर सतत या संवादाचे सत्र आयोजित केले जाते.’रायसिना डायलॉग’ हे विविध देशांतील लोकांचे एक व्यासपीठ आहे. यामध्ये जगभरातील परिस्थिती आणि आव्हाने या विषयावर अर्थपूर्ण चर्चा केली जाते. यासोबत जगाच्या भू-राजकीय आणि भू-आर्थिक विषयांशी संबंधित तसेच जागतिक राजकारण, व्यापार, माध्यमं अशा अनेक विषयांवर या कार्यक्रमात संवादपर चर्चा होत असते.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -