घरदेश-विदेशNarendra Modi : पंढरपूरच्या पालखी मार्गांचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन, 'असा'...

Narendra Modi : पंढरपूरच्या पालखी मार्गांचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन, ‘असा’ असेल यापुढील पालखी मार्ग

Subscribe

वारकरी सांप्रदायासाठी उभारण्यात येत असलेल्या १० हजार कोटींच्या पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. यात ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाची पायाभरणी केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी या भूमिपूजन सोहळ्याला ऑनलाईन माध्यमातून हजेरी लावणार आहेत. तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही यासाठी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी विशेष पदपथ बांधला जाणार आहे.

यात संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग हा पंढरपूर ते आळंदी असा असेल. तर संत तुकारामा महाराज पालखी मार्ग देहू ते पंढरपूर असा असणार आहे, आज दुपारी साडे तीन वाजता हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे, यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील (NH-965) पाच विभागांचे चौपदरीकरण, तर श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या (NH-965G) तीन विभागाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे पायी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांची वाट अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

वारकऱ्यांसाठी स्वतंत्र पदपथ

दरवर्षी देशासह जगभरातून कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पंढपूरला जात असतात. मात्र या वारकऱ्यांना रस्तेमार्गेच चालावे लागत असल्याने अपघातांच्या घटना अनेकदा समोर आल्या आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने वारकऱ्यांना चालण्यासाठी पदपथ बांधले जाणार आहेत. जेणेकरून वारकऱ्यांना सुखरुप आणि सुरक्षित वारी करता येईल. यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर दिवेघाट ते मोहोळअसा सुमारे २२१ किलोमीटरचा अंदाजे ६ हजार ६९० कोटींचा चार पदरी रस्ता केला जाईल, तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर पाटत ते तोंडळे-बोंडाळे असा सुमारे १३० किलोमीटरचे चौपदरीकरण केले जाईल. तर वारकऱ्यांसाठी ४ हजार ४०० कोटी रुपयांचे पदपथाची निर्मिती केली जाणार आहे.

- Advertisement -

पंढरपूरला जोडणाऱ्या अन्य महामार्गांचा शुभारंभ

पंढरपूरला जोडणाऱ्या अन्य महामार्गांचा भूमिपूजन सोहळाही आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्य़ा हस्ते होणार आहे. पंढरपूरला जोडणाऱ्या २२३ किलोमीटरपेक्षा अधिक पूर्ण झालेले आणि सुधारित रस्ते प्रकल्पाचं लोकार्पण करतील. यात म्हसवड-पिलिव-पंढरपूर (NH-548E), कुर्डूवाडी-पंढरपूर (NH-965C), पंढरपूर-सांगोला (NH-965C), त्याचबरोबर NH-561A चा टेंभुर्णी-पंढरपूर विभाग आणि पंढरपूर-मंगळवेळा-उमदी विभागातील रस्त्यांचा समावेश आहे. त्याची अंदाजे किंमत १ हजार १८० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -