घरताज्या घडामोडीयंदा PM Narendra Modi लिखित Garbo गीतावर तरुणाई धरणार ठेका; तुम्ही पाहिलंय...

यंदा PM Narendra Modi लिखित Garbo गीतावर तरुणाई धरणार ठेका; तुम्ही पाहिलंय का गाणं

Subscribe

नवी दिल्ली – रविवारी घटस्थापना होणार आहे. उद्यापासून नवरात्रीचा उत्साह गुजरातसह देशभर पाहायला मिळेल. त्याआधी पंतप्रधानांनी एक ट्विट करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. नवरात्रीनिमित्त जॅकी भगनानी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या गरबा गीताचा व्हिडिओ रिलीज केला आहे. पंतप्रधानांनी त्यांचे गीत नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर रिलीज केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारपासून सुरुवात होत आहे. गुजरात-महाराष्ट्रासह उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होत असतो. उद्यापासून ठिकठिकाणी दांडिया आणि गरबाची धूम पाहायला मिळणार आहे. दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी तुम्ही गाण्यांचीही निवड केली असणार. त्यात आता पंतप्रधानांच्या गाण्यावर ठेका धरण्याची संधी तुम्हाला जॅकी भगनानी याने उपलब्ध करुन दिली आहे.

- Advertisement -

पंतप्रधानांच्या कवितेवर आधारीत गरबा गीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कवी असल्याचे सर्वांनाच माहित आहे. आता त्यांच्या गीतावर आधारीत गरबा म्युझिक व्हिडिओ यूट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. जॅकीने म्हटले आहे, की हे गीत नवरात्रीच्या उत्सवात एक वेगळाच माहौल तयार करत आहे. नवरात्रोत्सवाच्या रंगात रंगलेले हे गीत असल्याचं जॅकी भगनानीने म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका कवितेवरुन प्रेरणा घेऊन हे गीत रचण्यात आले आहे.

पंतप्रधान त्यांच्या कवितेत नवरात्रोत्सवाबद्दल लिहितात, वेगवेगळ्या राज्यातील प्रथा-परंपरा-संस्कृती या सर्वांना हा उत्सव एकत्रित करतो, एकजूट करतो.
या गीताला स्वरसाज ध्वनी भानुशालीने दिला आहे तर तनिष्क बागचीने कम्पोज केले आहे.

- Advertisement -

आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण

पंतप्रधानांनी त्यांच्या गीतावर आधारीत व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर ध्वनी भानुशालीला टॅग करत लिहिले, गरब्याच्या या अतिशय सुंदर सादरीकरणासाठी धन्यवाद. कित्येक वर्षांपूर्वी मी ही कविता लिहिली होती. अनेक आठवणींना या गीताने उजाळा दिला आहे. बऱ्याच वर्षांपासून मी काही लिहिलेले नाही. मात्र काही दिवसांपूर्वीच मी एक गरबा लिहिला आहे, आगामी नवरात्रोत्सवात मी सर्वांसोबत त्याला शेअर करेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -