घरमहाराष्ट्रयोग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन पुढची कारवाई करू; न्यायालयाने फटकारल्यानंतर नार्वेकरांची प्रतिक्रिया

योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन पुढची कारवाई करू; न्यायालयाने फटकारल्यानंतर नार्वेकरांची प्रतिक्रिया

Subscribe

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आमदार अपात्रता प्रकरणात करण्यात येणारी दिरंगाई या प्रश्नावरून आज (13 ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधानसक्षा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पुढची कारवाई योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन करू, असे त्यांनी म्हटले आहे. (Take appropriate legal advice and take further action Reaction of Rahul Narvekar after being reprimanded by the court)

माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार परडी आणि न्यायालयाने जे आदेश दिले आहेत, त्या आदेशासंदर्भातील प्रत माझ्याकडे प्राप्त झाले आहे. त्या आदेशाच्या प्रतमध्ये जे लिहिलेल आहे, त्याचे अवलोकन केल्यानंतर जी कारवाई अपेक्षित आहे, ती कारवाई केली जाईल. या संदर्भातील पुढची कारवाई योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही या विषयाचा निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation : जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिल्यानंतर भाजपाकडून सूचक ट्वीट

वेळापत्रक दोन महिने किंवा इतक्या दिवसात द्या, असे कुठेही म्हटले गेले नाही. त्यामुळे कोण काय म्हणतं, यावर मी लक्ष देत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात जे लिहिलं आहे, त्याची दखल मी घेतो आणि त्या अनुषंगाने कारवाई करण्याचा कायदेशीर सल्ला मी घेत आहे. परंतु आज जी प्रत माझ्या हाती आली आणि ती ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे, ती तुम्ही वाचावी. त्यात कुठेही न्यायालयाने जे काही वृत्तपत्रांमध्ये वाचण्यात येत आहे किंवा इतर काय टीका टिप्पणी होत आहे, यासंदर्भात न्यायालयाने आपल्या आदेशात उल्लेख केला नाही. त्यामुळे ज्या गोष्टींचा न्यायालयाने आदेशात उल्लेख केला नाही, त्या गोष्टींबाबत दखल घेणं अपेक्षित योग्य समजत नाही.

- Advertisement -

आपल्या संविधानामध्ये न्याय मंडळ म्हणजे जोडी शहरी विधिमंडळ म्हणजे लेजिस्लेचर आणि कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह या तिघांनाही समान स्थान दिल आहे. कोणाचेही कोणावर सुप्रिटेंडन्ट नाही, असे असताना न्यायालयाचा आदर ठेवून किंवा संवेधानातून निर्माण झालेल्या इतर एजन्सीचा आदर ठेवणं, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ज्या व्यक्तीला सद्याच्या लोकशाहीवर विश्वास आहे, ज्यांचा लोकशाहीमध्ये स्टेक आहे, ते निश्चितपणे संविधानाने निर्माण केलेल्या एजन्सीचा मान राखतील.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना समज द्यावी; लाखोंच्या जाहीर सभेत जरांगे पाटलांची मागणी

माझा संविधानावर पूर्ण विश्वास असल्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा आणि न्यायालयाचा मान राखणं, हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी पार पाडणार. परंतु असे असताना मी आपल्याला सांगू इच्छितो विधानसभेचा अध्यक्ष म्हणून एकूण विधानसभेच्या आणि विधिमंडळाचे सार्वभौमत्व राखणं आणि कायम ठेवणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे मंडळाच्या सार्वभौमत्वाविषयी कोणत्याही प्रकारची तडजोड मी होऊ देणार नाही, अथवा करणार नाही आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा योग्यरीत्या आदर ठेवत, ही विधिमंडळाची सार्वभौमत्व कायम ठेवण्यासंदर्भातील कारवाई करेल.

न्यायप्रक्रिवर प्रभाव टाकण्यासाठी आरोप होतात

ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी केलेल्या आरोपावर बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, अध्यक्षांच पद कोणाचं वैयक्तिक पद नसते. पण काही लोकांना अध्यक्षांच्या पदाचा अवमान करणं उचित वाटत असेल तर त्यांना त्याबद्दलच्या शुभेच्छा. आरोप करणारे अनेक लोक असतात, आरोप केले जातात. हे न्यायप्रक्रिवर प्रभाव टाकण्यावर केले जातात. पण मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे अशा सगळ्या गोष्टींमुळे मी प्रभावित होत नाही आणि अशा गोष्टींना उत्तर देणं ही आवश्यक वाटत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -