घरदेश-विदेश'व्हाईट नाईट कॉर्प्स' शहीदांच्या कुटुंबासोबत; पाच जवानांची नावे जाहीर

‘व्हाईट नाईट कॉर्प्स’ शहीदांच्या कुटुंबासोबत; पाच जवानांची नावे जाहीर

Subscribe

 

मुंबईः जम्मू-काश्मिरमधील पुंछ येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवांनाची नावे भारतीय लष्कराने जाहीर केली आहेत.  हवालदार मनदीप सिंह, लान्स नायक देबाशिष बसवाल, लान्स नायक कुलवंत सिंह, शिपाई हरकृष्ण सिंह आणि शिपाई सेवक सिंह अशी शहीद जवानांची नावे आहेत. शहीद जवानांच्या शोकाकुल कुटुंबांसोबत एकजुटीने उभे आहे, असे ट्वीट ‘व्हाईट नाईट कॉर्प्स’ या लष्कराच्या तुकडीने केले आहे.

- Advertisement -

काश्मीरमधील जम्मू-पुंछ नॅशनल हायवेवर दहशतवाद्यांनी गुरुवारी हल्ला केला. सुरुवातीला गाडीवर काही तरी पडल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. परंतु लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ यांना या घटनेची सविस्तर माहिती दिली. मनोज पांडे यांनी सांगितले की, “दहशतवाद्यांनी आज राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पूंछ दरम्यान प्रवास करणाऱ्या लष्कराच्या गाडीवर गोळीबार केला. यावेळी दहशतवाद्यांनी गाडीवर ग्रेनेड हल्ला केल्यामुळे गाडीने पेट घेतला. दहशतवादविरोधी कारवाईसाठी या भागात तैनात असलेल्या राष्ट्रीय रायफल्स युनिटच्या जवानांना आजच्या घटनेत आपले प्राण गमवावे लागले. आणखी एका गंभीर जखमी जवानाला तात्काळ राजौरी येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लष्कराकडून या भागात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले.

लष्कराच्या गाडीला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक त्या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी लष्कराच्या जवानांना मदत केली. लष्कराच्या वाहनाला लागलेली आग इतकी भीषण होती आगीचे रौद्र रूप लांबून दिसत होते.या अपघातात पाच जवान शहीद झाले. हल्ला झाला त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. याचा फायदा घेत हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -