घरमहाराष्ट्र'पुरावे दाखवूनही गुन्हे दाखल होत नाहीत', म्हणत सुषमा अंधारेंनी उचललं 'हे' मोठं...

‘पुरावे दाखवूनही गुन्हे दाखल होत नाहीत’, म्हणत सुषमा अंधारेंनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Subscribe

यावर माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. परंतू या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी एक मोठं पाऊल उचललंय. आमदार संजय शिरसाट यांच्या वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी पुरावे दाखवूनही गुन्हे दाखल होत नाहीत, असा आरोप यावेळी सुषमा अंधारेंनी केलाय.

आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्या सुषणा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भाषण करत असताना सुषमा अंधारे यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले. या प्रकरणी सुषमा अंधारेंनी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात केवळ तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत.
यावर माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय. “मी मध्यमवर्गीय आहे. आमच्या मध्यमवर्गीयांमध्ये अब्रुशिवाय दुसरं जपायचं काहीच नसतं. अब्रूची किंमत करता येत नाही. ती लाखो करोडोमध्ये किंमत होऊ शकत नाही. त्यामुळे यात मला कोणताही आर्थिक लाभांश किंवा स्टंटबाजी करायची नाही. मी भटक्या विमुक्त वर्गातून येते. भटक्या विमुक्त जमातीच्या स्वतंत्र न्यायव्यवस्थेमध्ये महिलांचा अपमान हा सगळ्यात मोठा अपमान समजला जातो. यासाठी सर्वात मोठी शिक्षा म्हणून तीन रूपयांचा दंड ठोठावला जातो. भटके विमुक्ताच्या न्यायव्यवस्थेनुसार ज्या व्यक्तीला तीन रूपयांची शिक्षा होते, त्याला भटक्या जमातीत माणूस नव्हे तर जनावरांचा करार देतात. ज्याला माणसासारखं वागता येत नाही. जो माणूसपणाचे सर्व गुणधर्म सोडून वागतो, अशा माणसांना हा तीन रूपयांचा दंड ठोठावला जातो.”,

- Advertisement -

हे ही वाचा : डान्स शिकवण्याच्या नावाखाली सुरू होता भलताच उद्योग, मल्ल्याळी डान्स टीचरला अटक

यापुढे बोलताना अंधारे म्हणाल्या, “अब्दुल सत्तारांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेलं वक्तव्य, तसंच गुलाब पाटील यांच्याकडूनही अशाच प्रकारची वक्तव्ये झालीत. या वक्तव्यांना चाप बसणे गरजेचे आहे. सरकार पक्षाने संबंध महाराष्ट्राचे चालक पालक म्हणून काम करायला हवं. पण असं न करता फक्त सत्ताधारांच्याच हितासाठी लढू असं म्हणत शीतल म्हात्रेंचं रॅली प्रकरण, गणेश बीडकरांचं डान्स बार व्हिडीओ प्रकरण यात सांगितलं की गुन्हा दाखल होतो. आम्ही मात्र ओरडून, पुरावे देऊन सुद्धा गुन्हे दाखल होत नाहीत.” , असा आरोपही यावेळी करण्यात आला.

- Advertisement -

पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून न घेतल्यामुळे आता अंधारे थेट न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत. यासंदर्भात नोटीस पाठवून शेवटची संधी देऊन शिरसाट यांच्यांकडून उत्तर मागवू. परंतू त्यांना अद्याप कोणता पश्चाताप झालेला दिसत नसल्याचं ही अंधारे म्हणाल्या.

“राजकारणात शीर्षस्थानी काम कऱणाऱ्या महिलांबाबत लोकप्रतिनिधींकडून केलेल्या विधानांवर कोणतीही कारवाई झाली नाही तर सर्वसामान्य महिलांचं काय? असा सवाल देखील यावेळी अंधारेंनी व्यक्त केलाय. तसंच जर लोकप्रतिनिधीच कायदा पाळत नसतील तर त्यांना कायदा काय आहे, हे दाखवून देणे गरजेचं असल्याचं देखील यावेळी अंधारे म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -