घरदेश-विदेशकलबुर्गी हत्याप्रकरणी आणखी एक तरूण अटकेत

कलबुर्गी हत्याप्रकरणी आणखी एक तरूण अटकेत

Subscribe

पुरोगामी विचारवंत प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणी कर्नाटक एटीएसने एका तरूणाला अटक केली आहे. धारवाड न्यायालयाने या तरूणाला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कलबुर्गी यांचा खून ३० ऑगस्ट २०१५ ला झाला आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या पुरोगामी विचारवंतांची गेल्या काही वर्षात हत्या करण्यात आली होती. मात्र या प्रकरणाला चार वर्ष उलटून गेली असली तरी तपास ठप्प आहे. या विरोधात कोणत्याही अरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये. एकाच विचारधारेतील हे तिघही व्यक्ती असल्यामुळे त्या तिघांचा खून एकाच व्यक्तीने केला असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. केवळ एक व्यक्ती नाही तर हे तिनही खून एकाच रिव्हॉल्व्हरमधून झाल्याचा संशय आहे. सध्या या खुनाचा तपास सीबीआय, एनआयए या तपास यंत्रणा व महाराष्ट्र शासन, कर्नाटक व गोवा शासन करत आहे. पण या सगळ्यांमध्ये तपासादरम्यान ताळमेळ नाहीये.

- Advertisement -
डॉ. नरेंद्र दाभोलकर, पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे, कर्नाटकात प्रा. एम.एम. कलबुर्गी

या तिघांची हत्या एकाच व्यक्तीने केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे लंकेश, कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा छडा लागल्यास त्यातून पानसरे यांच्या खुनाचीही उकल होईल अशी अशा पोलिसांना आहे. या आधी पोलिसांनी हुबळीचा गणेश मिस्कीन (वय २७) याला अटक करण्यात आली होती. लंकेश यांच्या खुनावेळी तो मोटारसायकल चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो एसआयटीच्या अटकेत आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक एटीएसने सहा महिन्यांपूर्वीच प्रवीण चतूर या तरूणाला ताब्यात घेतले होते. आता आणखी एका तरूणाला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी आतापर्यंत एकूण १२ जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातून अमित काळे, गोव्यातून अमित डेगवेकर यांच्यासह सुचितकुमार, केटी नवीनकुमार, मोहन नायक, मनोहर एडवे, अमित बड्डी, गणेश मिस्कीन, राजेश बंगेरा, भारत कुरणे, सुरेशकुमार अशी अन्य आरोपींची नावे आहेत. त्यातील खुनाची कबुली दिलेल्या चौघांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. तर पुरुषोत्तम वाघमारे यांच्यावर पिस्तूल चालवण्याचा आरोप आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -