घरमुंबईशिवसेनेच्या महापौराला राणीच्या बागेतच बसवला पाहिजे - निलेश राणे

शिवसेनेच्या महापौराला राणीच्या बागेतच बसवला पाहिजे – निलेश राणे

Subscribe

शिवसेनेवर वादग्रस्त ट्विट किंवा टीका करण्यामध्ये अग्रेसर असलेले राणे कुटुंब सगळ्यांना माहित आहे. त्यातच निलेश राणे यांचे ट्विट म्हटलं तर त्यात काहीतरी वादग्रस्त असणार हेही तितकेच खरे. आता देखील निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर वादग्रस्त ट्विट केले आहे. जोपर्यंत शिवसेनेचा महापौर असणार तोपर्यंत त्याला राणीच्या बागेतच बसवला पाहिजे, अशी टीका निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.

- Advertisement -

काय केली निलेशनी शिवसेनेवर टीका 

मुंबई महानगरपालिकेतली नालेसफाईची कामे असमाधानकारक झाली आहेत, असे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटले आहे. याच बातमीचा आधार घेत निलेश राणे यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे. दरम्यान याआधी निलेश राणे यांनी शिवसेनेला केंद्रात एक मंत्रीपद दिल्यावरून शिवसेनेवर टीका केली होती. मात्र आज त्यांनी पुन्हा एकदा महापौर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -