घरदेश-विदेश'भारत छोडो' आंदोलनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचा INDIA आघाडीवर निशाणा

‘भारत छोडो’ आंदोलनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचा INDIA आघाडीवर निशाणा

Subscribe

नवी दिल्ली | महात्मा गांधींनी 1942 साली या दिवशी ब्रिटिशांविरुद्ध ‘छोडो भारत आंदोलन’ सुरू केले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज ‘छोडो भारत आंदोलन’ सहभागी झालेल्या लोकांना व्हिडीओ ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे. देशाच्या इतिहासात 9 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिवस ओळखली जातो. या व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधानांनी विरोधकांची आघाडी ‘इंडिया’वर निशाणा साधला आहे.

“महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ‘भारत छोडो आंदोलना’ने स्वातंत्र्य मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आज भारत एका सुरात म्हणत, भ्रष्टाचार छोडो भारत, राजवंश छोडो भारत, तुष्टीकरण भारत छोडो”, असे ट्वीट करत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

पीएम मोदींनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणाले, “9 ऑगस्ट ही तारीख भारतातील सर्वात मोठ्या आंदोलनाची तारीख ठरली आहे. 9 ऑगस्टलाच गांधीजींच्या नेतृत्वाखाली ‘चले जाव’. भारत आंदोलन म्हणजेच भारत छोडो आंदोलन सुरू झाले. आदरणीय बापूंनी इंग्रजांना स्पष्टपणे सांगितले होते – भारत छोडो.”

- Advertisement -

हेही वाचा – ‘निंदकाचे घर असावे शेजारी’, ऑगस्ट क्रांती कार्यक्रमात फडणवीस असे का म्हणाले…

राज्यात ‘मेरी माटी, मेरा देश’या अभियानाची सुरुवात

राज्यात ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्ताने ‘मेरी माटी, मेरा देश’या अभियानाची सुरुवात झाली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटावर हल्लाबोल केला. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्रात आणि मुंबईत मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वात विकासाची कामे सुरु आहेत. मुंबईत सौंदर्यीकरण आणि विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्याला काही लोकांकडून विरोध होत आहे. रोज पत्र लिहिली जात आहेत. असेच पत्र गेल्या २५ वर्षांत त्यांनी स्वतःला लिहिले असते तर मुंबई अधिक सुंदर झाली असती.’ अशी टीका फडणवीसांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -