घरदेश-विदेशप्रियांका चोप्रासुद्धा दिल्लीतील प्रदुषणाबाबत चिंतीत

प्रियांका चोप्रासुद्धा दिल्लीतील प्रदुषणाबाबत चिंतीत

Subscribe

तोंडाला मास्क लावलेला फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत प्रियांकाने दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त केली आहे.

मागील काही दिवसांपासून दिल्ली-एनसीआर परिसरात हवेचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये आरोग्य आणीबाणीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. एवढेच नाही तर तेथील शाळांनासुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान दिल्लीतील हवेच्या प्रदूषणामुळे संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण असताना बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनेसुद्धा दिल्लीतील हवा प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. प्रियांकाच्या आगामी ‘द व्हाइट टायगर’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या दिल्लीत सुरु आहे. तोंडाला मास्क लावलेला फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत प्रियांकाने दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाली प्रियांका?

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर प्रियांका चोप्राने चिंता व्यक्त केली आहे. त्याबाबतचा फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांकाने तोंडाला मास्क लावला आहे. तिने लिहिले की, “‘द व्हाइट टायगर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचे दिवस सुरु आहेत. आता येथे चित्रीकरण करणे कठीण झाले आहे. या परिस्थितीत येथे राहिल्यास काय होईल? याची मी कल्पना सुद्धा करु शकत नाही.” तिने पुढे लिहिले की, “आपल्याकडे आज एयर प्यूरिफायर आणि मास्क आहेत, त्यासाठी आपण आभारी आहोत. पण बेघरांसाठी प्रार्थना करुया…”.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -