घरदेश-विदेशनीरव मोदीच्या अटकेवर प्रियंका गांधींचे भाजपवर टीकास्त्र

नीरव मोदीच्या अटकेवर प्रियंका गांधींचे भाजपवर टीकास्त्र

Subscribe

नीरव मोदीला लंडनच्या न्यायालयाने अटक केली आहे. त्यामुले भाजप नेते स्वत:च्या पाठीवर कौतुकीची थाप मारुन घेत आहेत, असा आरोप विरधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे.

पीएनबी घोटाळ्याचा प्रमुख आरोपी नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आले आहे. भारताच्या विनंतीनंतर लंडनमधील न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे. याच पार्श्वभूमीव काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटमीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार कडून ही कारवाई करण्यात आली असल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत. प्रियंका गांधी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका सभेत मोदी सरकारवर टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई का होत आहे? असा प्रश्न प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर हे यश आहे का? असाही सवाल त्यांनी केला आहे.

यात यश कसलं? – प्रियंका गांधी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत. यासोबतच नीरव मोदीच्या विरोधात लंडनमधील न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यावरुन मोदी सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. दरम्यान प्रियंका गांधी यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘नीरव मोदीला लंडनमध्ये अटक होणे, यात यश कसलं? त्याला भारताबाहेर कोणी जाऊ दिलं?’, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

‘निवडणुकीनंतर त्याला पुन्हा विदेशात पाठवले जाईल’

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलामी नबी आझाद यांनीही नीर मोदीच्या अटकेवर मोदी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘मोदी सरकारनेच नीरव मोदीला देश सोडून जाण्यास मदत केली आणि आता तेच त्याला परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीसाठी या घडामोडी सुरु आहेत. निवडणूक झाल्यावर त्याला परत विदेशात पाठवण्यात येईल.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -