घरदेश-विदेशरेल्वे तिकीटावरून मोदींचा फोटो वगळणार

रेल्वे तिकीटावरून मोदींचा फोटो वगळणार

Subscribe

आचारसंहितेदरम्यान प्रचारावर बंदी असल्याने पंप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो रेल्वे तिकीटावरून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाला याची तक्रार करण्यात आली आहे.

देशात निवडणुकीची तारीख जवळ येत आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागू करण्यात येते. आचारसंहितेदरम्यान कोणताही पक्ष आपला प्रचार करू शकत नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो रेल्वे तिकीटावर असल्यावरून आक्षेप घेतला जात आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून हा आक्षेप घेण्यात आला आहे. याबद्दल पक्षाने निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले आहे. आचारसंहितेदरम्यान पंतप्रधान मोदींचा फोटो रेल्वे तिकीटावरून काढण्याची मागणी केली आहे. रेल्वे तिकीटावरील मोदींच्या फोटोमुळे पक्षाचा प्रचार होत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने याविषयावर अद्याप कोणतेही अधिकृत वक्यव्य केलेले नाही.

तिकीटावरील जाहिरातींवर घेतला आक्षेप

भारतीय रेल्वे तिकीटांच्या मागील बाजूस सरकारच्या जाहिराती छापलेल्या असतात. बाहेर गावी जाण्यासाठी केलेले आरक्षित केलेल्या तिकीटांचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. दररोज लाखोंच्या संख्येने भारतीय नागरिका प्रवासासाठी रेल्वेचा वापर करतात. या लोकांना मिळणार्या तिकीटाच्या मागील बाजूस केंद्र सरकारच्या योजनेबद्दलची जाहिरात असते. या जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही फोटो वापरले गेले आहे. स्वच्छ भारत, बेटी बजाव, उज्वला योजना आणि इतर सरकारी योजनांबद्दल या जाहिराती असतात. भारतीय रेल्वे ही केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याने या जाहिराती केंद्राकडून केल्या जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -