घरदेश-विदेशआदर्श सून बनायचंय तर बीएचयू विद्यापीठातून करा हा कोर्स

आदर्श सून बनायचंय तर बीएचयू विद्यापीठातून करा हा कोर्स

Subscribe

खासगी संस्था आणि डॉटर्स प्राईड- बेटी मेरा अभियान अंतर्गत हा कोर्स तयार करण्यात आला आहे. बीएचयू विद्यापीठातून लग्नाआधी आदर्श सून बनण्याचे धडे तरुणींना घेता येणार आहे.

एखाद्या विद्यापीठामध्ये आदर्श सून बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते असं ऐकल्यावर कोणालाही आश्चर्यच वाटेल. पण हे खरं आहे. कारण आदर्श सून बनण्यासाठी वाराणसीतील काशी हिंदू विद्यापीठाच्या आयआयटी विभागाकडून मुलींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा कोर्स तीन महिन्याचा असणार आहे. त्यामुळे आता लग्नाआधी आदर्श सून बनण्याचे धडे तरुणींना घेता येणार आहे.

‘बेटी मेरी अभिमान’ कोर्स

बऱ्याचदा आपले मत दुसऱ्यांच्या समोर न मांडणे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींमुळे मुलींना बऱ्यांचदा निराशा येते. ज्याचा परिणाम कुटुंबियांच्या आनंदावर पडत असतो. याच मुलींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी बीएचयूच्या आयआयटी विभागाकडून प्रशिक्षण केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यंग स्किल्ड इंडियाचे सीईओ नीरज श्रीवास्तव यांच्या मते, समाजात वाढणाऱ्या समस्या पाहता या कोर्सची सुरुवात करण्यात आली आहे. बेटी मेरी अभियान असं या कोर्सला नाव देण्यात आले आहे.

- Advertisement -

याचे दिले जाणार प्रशिक्षण

तीन महिन्याच्या या कोर्समध्ये मुलींना आत्मविश्वास, कौशल्य, समस्या सोडवण्याचे कौशल्य, तणावाच्या प्रसंगी दाखवले जाणारे गुण याचसोबत कम्प्युटरची माहीती हे शिकवले जाणार आहे. त्याचसोबत फॅशनबद्दलंचे ज्ञान, लग्नाचे कौशल्या आणि सामाजिक गुण शिकवले जाणार आहेत. ज्या मुली संकोचामुळे इतरांशी बोलू शकत नाही. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा कोर्स महत्वपूर्ण ठरेल. या कोर्समध्ये व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण, फॅशन डिझायनर आणि समुपदेशक एक महत्वाची भूमिका साकारणार आहेत. हे एक अनोखे पाऊल असून एक उदाहरण बनू शकते. या कोर्ससाठी लवकरच मुलींच्या निवडीची तयारी सुरु होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -