घरदेश-विदेशPulwama terror attack - केंद्र सरकारने फुटीरतावाद्यांची सुरक्षा काढली

Pulwama terror attack – केंद्र सरकारने फुटीरतावाद्यांची सुरक्षा काढली

Subscribe

केंद्र सरकाराने फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडून सरकारी गाड्याही काढूण घेतल्या आहेत.

गुरुवारी पुलवामा येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात देशाचे ४० जवान शहीद झाले आहेत. या घटनेनंतर दहशतवाद्यांना रसद पोहचिवणाऱ्या आणि आयएसआयशी संपर्कात असलेल्या जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना सरकारकडून देण्यात आलेल्या गाड्याही काढून घेण्यात आला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मीरचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेणार, असे सांगितले होते. यानंतर रविवारपासून त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

‘या’ नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये ऑल इंडिया हुर्रीयत कॉन्फ्रेंसचे अध्यक्ष मीरवाइज उमर फारुख, शबीर शाह, हाशिम कुरैशी, बिलाल लोन, फजल हक कुरैशी आणि अब्दुल गली बट या नेत्यांची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानसार आज संध्याकाळपासून फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा आणि गाड्या काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतर सुविधाही त्यांना मिळणार नाहीत. त्याचबरोबर एका अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले आहे की, ‘कुठल्या फुटारतावाद्यांना अजूनही सेवा मिळत आहे का? याचा तपास आम्ही घेत आहोत. ज्या फुटीरतावादी नेत्यांना अजूनही सुविधा मिळत असेल, त्यांची सुविधा ताबोडतोब काढण्यात येईल.’

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -