घरदेश-विदेशशहिदांच्या नावावर फसवणूक करण्याऱ्या वेबसाईट्सपासून सावधान!

शहिदांच्या नावावर फसवणूक करण्याऱ्या वेबसाईट्सपासून सावधान!

Subscribe

शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणाऱ्यांची खोट्या वेबसाईट्सवरुन फसवणूक होत असल्याची माहिती केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन सिंह यांनी केले आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये देशाचे ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले आहेत. या घटनेनंतर देशभरातील नागरिक शहीद कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. परंतु, काही समाजकंटक मदत करणाऱ्या नागरिकांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मदत करणाऱ्या नागरिकांच्या भावनांशी खेळले जात आहे. याबाबतचे स्पष्टीकरण स्वत: देशाचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्याचबरोबर या अशा समाजकंटक लोकांकडून मदत करणाऱ्या नागरिकांची फसवणूक होत असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला सिंह यांनी दिला आहे.

मदतीच्या खोट्या संस्था स्थापन

काही भामट्यांनी जवानांच्या कुटुंबियांना मदतीच्या नावाने खोट्या संस्थांची स्थापना केली आहे. अशा खोट्या संस्था स्थापन करुन लोकांकडून पैसे हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय, इंटरनेटवरदेखील अशाप्रकारचे संकेतस्थळे सुरु करण्यात आले आहेत. या अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले आहे.

- Advertisement -

‘या’ वेबसाईटवरून करा मदत

शहीद जवानांच्या कुटुबियांना मदत करण्याचे आवाहन विविध सामाजिक संस्था आणि लोकांकडून करण्यात येत आहे. परंतु, काही समाजकंटक लोकांच्या भावनांशी खेळत आहेत. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले आहे. त्याचबरोबर https://bharatkeveer.gov.in या वेबसाईटवर मदत करण्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -