घरताज्या घडामोडीपंजाब सरकारवर तीन लाख कोटींच कर्ज, आश्वासनांची पूर्तता करताना भगवंत मान यांची...

पंजाब सरकारवर तीन लाख कोटींच कर्ज, आश्वासनांची पूर्तता करताना भगवंत मान यांची दमछाक

Subscribe

ऑल इज वेल असल्याचा देखावा करणारे पंजाब सरकार कर्जबाजारी झाले असून मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याचे खापर मागील सरकारवर फोडले आहे. मागील सरकारच्या काळात सरकारी तिजोरीत जमा झालेले पैसे गेले कुठे त्याचा कसा व कोणी वापर केला याचा शोध आता आप सरकार घेणार आहे. तसेच ज्यांच्याकडे हा पैसा गेला असेल त्याची वसुली केली जाईल कारण तो जनतेचा पैसा असल्याचे टि्वट पंजाब सरकारने केले आहे.

विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच विधानसभा निवडणुकांआधीच आपच्या नेत्यांनी सरकारवर राज्याला कर्जाच्या खाईत ढकलल्याचा आरोप केला होता. निवडणुकीआधी आपचे नेते राघव चड्ढा यांनी पंजाबमध्ये मागील सरकार असलेल्या अकाली भाजप आणि  काँग्रेसवर राज्याला कर्जबाजारी केल्याचा आरोप केला होता. तसेच या कर्जाची गंभीरता जनतेला कळावी म्हणून पंजाबमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलांवर जन्मताच एक लाख रुपयाचे कर्ज असते असा आरोप केला होता. तसेच काँग्रेस आणि बादल सरकारने गेल्या ५० वर्षात पंजाबवर ३ लाख कोटीचे कर्ज केल्याचा आरोपही आपने केला होता.

- Advertisement -

त्यातच मान यांनी विधानसभा निवडणुक प्रचारावेळी पंजाबच्या जनतेला अनेक आश्वासन दिली होती. पण त्याची पूर्तता करताना सरकारी तिजोरीतच खडखडाट असल्याचे समोर आले. यामुळे मान संतापले असून हा पैसा गेला कुठे याचा शोध घेणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -