घरमुंबईबेस्ट प्रवाशांसाठी 'टॅप इन टॅप आऊट' सुविधा; चिल्लरची कटकट होणार दूर

बेस्ट प्रवाशांसाठी ‘टॅप इन टॅप आऊट’ सुविधा; चिल्लरची कटकट होणार दूर

Subscribe

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बेस्ट उपक्रमाद्वारे अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अशातच आता बेस्ट उपक्रमानं प्रवाशांकरीता अनोखी सुविधा आणली आहे. कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू असलेल्या बेस्ट उपक्रमाने आपल्या बस प्रवाशांना सुखकारक प्रवासासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बेस्ट उपक्रमाद्वारे अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अशातच आता बेस्ट उपक्रमानं प्रवाशांकरीता अनोखी सुविधा आणली आहे. कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू असलेल्या बेस्ट उपक्रमाने आपल्या बस प्रवाशांना सुखकारक प्रवासासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. बेस्ट परिवहन विभागानं प्रवाशांना बस प्रवास करतांना भेडसावणाऱ्या सुट्ट्या पैशांची कटकट आणि त्यावरून बस वाहक आणि प्रवासी यांच्यात होणारी भांडणं यांची कायमची दूर करण्यासाठी ‘टॅप इन टॅप आऊट’ सुविधा लवकरच उपलब्ध करणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना एका बेस्ट कार्डद्वारे तिकीट मिळणं व सुट्ट्या पैशांची अडचण दूर करणं सुलभ होणार आहे.

बेस्ट बसमधून प्रवास करताना, बस तिकीट घेण्यासाठी प्रवाशांनी, सुट्ट्या पैशांऐवजी 50, 100 अथवा 500 रुपयांची बंदी नोट काढली व बस चालकाकडे प्रवाशांना परत देण्यासाठी तेवढे सुटते पैसे नसतील तर प्रवासी व बस चालक यांच्यात नेहमीच भांडणे होताना दिसून येते. अगदी प्रकरण हमरीतुमरीवर जाते. त्यानंतर हेच प्रकरण अगदी पोलिसांपर्यंत जाते. त्यामुळे एकतर प्रवासी अथवा बस वाहक यांपैकी कोणा एकाला तरी ते प्रकरण जड जातं. त्यामुळं यामधून बेस्ट वाहक आणि प्रवाशांची सुटका करण्यासाठी बेस्टनं एक तोडगा काढला आहे.

- Advertisement -

भविष्यात प्रवाशांना तिकीट घेताना सुट्ट्या पैशांची कटकट भेडसावणार नाही. बेस्टकडून प्रवाशांना एका कार्डची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्या प्रवाशाने बस वाहकाला ते कार्ड दिल्यास ते मशीनवर लावल्यास त्या कार्डमधून बस प्रवास भाडं म्हणजे तिकिटीचे तेवढे पैसे कट होणार असून प्रवाशाला तिकीट मिळणार आहे. त्यामुळे लवकरच प्रवासी व वाहकांमधील चिल्लर कटकट दूर होणार आहे. बेस्ट उपक्रमाने प्रवाशांसाठी ‘टॅप इन टॅप आऊट’ सुविधा उपलब्ध केली आहे.

लवकरच बेस्टच्या बसमध्ये ही मशीन बसवण्यात येणार आहे. बेस्ट चलो स्मार्ट कार्ड तसेच चलो मोबाइल अॅपद्वारे प्रवासी सदर सुविधेचा लाभ घेऊ शकतात. संपूर्ण भारतात मोबाइल अॅपद्वारे ‘टॅप इन टॅप आऊट’ सेवा केवळ बेस्टमध्ये प्रथमच उपलब्ध होणार आहे. या आधुनिक सेवेमुळे बस प्रवाशांना सुट्ट्या पैशांच्या कटकटीपासून कायमचा दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची भारताच्या नव्या लष्करप्रमुखपदी नियुक्ती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -