घररायगडविरोधकांच्या सभा त्यागानंतर पनवेल पालिकेच्या अंदाजपत्रकास मान्यता

विरोधकांच्या सभा त्यागानंतर पनवेल पालिकेच्या अंदाजपत्रकास मान्यता

Subscribe

महानगरपालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटयगृहात सोमवारी महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय स्थायी समिती विशेष सभा स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या ऑफलाईन विशेष सभेत पनवेल महानगरपालिकेचे २०२२-२०२३ चे १४९९ कोटींच्या अंदाजपत्रकास बहूमताने मंजूरी देण्यात आली.

स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या विशेष सभेत पनवेल महानगरपालिकेचे आर्थिक वर्ष २०२२-२०२३ च्या १४९९ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास बहुमताने मंजूरी देण्यात आली. या वेळी मालमत्ता कर कमी करण्याची मागणी मान्य न केल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

महानगरपालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटयगृहात सोमवारी महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय स्थायी समिती विशेष सभा स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या ऑफलाईन विशेष सभेत पनवेल महानगरपालिकेचे २०२२-२०२३ चे १४९९ कोटींच्या अंदाजपत्रकास बहूमताने मंजूरी देण्यात आली. कोणतीही दरवाढ, कोणतीही कर वाढ नसलेल्या अंदाजपत्रकात महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. यावेळी स्थायी समितीचे सदस्य प्रकाश बिनेदार , संतोष शेट्टी , दर्शना भोईर , विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे , गणेश कडू , अरविंद म्हात्रे उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, लेखाधिकारी डॉ संग्राम व्होरकाटे, लेखापरिक्षक विनयकुमार पाटील, नगरसचिव तिलकराज खापर्डे, पालिका अधिकारी व इतर उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातिलाचा विरोधकांनी मालमत्ता कर कमी करण्या बाबत मागणी केली.

- Advertisement -

त्यावर चर्चा करण्यासाठी मतदान घेण्यात येऊन ७ विरूढ ५ मतांनी ती फेटाळण्यात आल्यावर विरोधकांनी सभात्याग केला. या अंदाजपत्रकात बांधकाम विभागाच्या विविध पायाभूत कामांसाठी ३२६ कोटी रूपये राखीव ठेवण्यात आले आहेत. गावठाण पायाभूत सोयी सुविधा ६२ कोटी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे १० कोटी, स्वराज्य या महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी ४० कोटी, महापौर निवास स्थान बांधणे १२ कोटी, प्रभाग कार्यालये बांधकाम १२ कोटी, माता रमाई आंबेडकर सामाजिक केंद्र उभारणे कोटी, तलाव सुशोभिकरण १४ कोटी, सिडको भूखंड हस्तांतरण आणि विकास ४० कोटी अशी भरीव तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.

याशिवाय इंग्लीश मिडीयम शाळा , शाळेच्या इमारती, ई- लर्निंग अंतर्गत संगणक प्रशिक्षण सेवा यासाठी २१ कोटींचा निधी महापिालकेने या अंदाजपत्रकात राखीव ठेवला आहे. महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने विविध योजना राबविण्यासाठी २.५२ कोटीचा निधीची तरदूत अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. दिव्यांगाचे पुर्नवसन करणे त्यांना उपयुक्त योजना राबविणे, आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने ५.२६ कोटीची भरीव निधी या अंदाजपत्रकात ठेवण्यात आला आहे. पनवेल महापालिका क्षेत्राचा पर्यावरण अहवाल तयार करण्यासाठी आयआयटी सारख्या संस्थाची मदत घेणे तसेच हवेतील प्रदुषणाची मात्रा मोजण्यासाठीची मशिन्स महापालिका क्षेत्रात बसविण्यासाठी १. ३० कोटीचा निधी अंदाजपत्रकात राखीव ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ, विविध वाहने खरेदी करणे,जेटिंग मशीन खरेदी करण्यासाठी ७५ कोटी राखीव ठेवण्यात आले आहे. पनवेल शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या दृष्टीने शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टी पुर्नविकास योजना राबविण्यासाठी २०५ कोटीचा निधी या अंदाजपत्रकात राखीव ठेवण्यात आला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन विभाग अद्ययावत करण्यासाठी २१ कोटीचा निधी राखीव ठेवण्यात आला असून या अंतर्गत विविध सुविधांनी युक्त अद्ययावत वाहने खरेदी करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -