घरदेश-विदेशRafale deal : 'मोदींनी माझ्याशी २० मिनिटं चर्चा करावी'

Rafale deal : ‘मोदींनी माझ्याशी २० मिनिटं चर्चा करावी’

Subscribe

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट चर्चेचं आव्हान दिलं आहे.

राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट चर्चेचं आव्हान दिलं आहे. पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी राफेल करारवर माझ्याशी २० मिनिटं चर्चा करावी असं थेट आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं आहे. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची एक व्हिडीओ क्लिप देखील दाखवली. ज्यामध्ये अरूण जेटली राफेल विमानाची किंमत १६०० कोटी असल्याचं सांगत आहेत. राहुल गांधी यांनी केलेल्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. लोकसभेमध्ये देखील आजच्या दिवसभरात राफेल करारावरून जोरदार गोंधळ झाल्याचं पाहायाला मिळालं. त्यामुळे लोकसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब देखील करण्यात आलं होतं.

वाचा – ‘राफेलची किंमत बालवाडीच्या मुलालाही कळेल, पण राहुल गांधींना कळत नाही’

लोकसभेत वात्रटपणा आणि कागदी विमानं

संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान लोकसभेमध्ये राफेल करारावरून जोरदार गोंधळ झाल्याचं चित्र पाहायाला मिळालं. लोकसभेतील चर्चेदरम्यान अनिल अंबानी AA, तर, क्वात्रोची Q अशा घोषणा देण्यात आल्या. काही खासदारांनी तर कागदी विमानं उडवत राफेल करारावरून मोदी सरकारवर टिका केली. हा सारा माहोल शाळेतील वात्रट मुलांना शोभावा असाच होता. यापूर्वी देखील राफेल करारावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राहुल गांधी यांनी भाजपला लक्ष्य केलं होतं. शिवाय, सभागृहातील ही लढाई रस्त्यावर देखील पाहायाला मिळाली.

- Advertisement -

देशात सध्या राफेल करारावरून राजकारण तापलं असून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप – प्रत्यारोप रंगल्याचं पाहायाला मिळत आहे. सध्या काँग्रेसनं राफेल करारावरून आक्रमक भूमिका घेतली असून भाजप देखील त्याला प्रत्युत्तर देताना दिसत आहे.

वाचा – Rafale Deal : जेटलींनी फेटाळली जेपीसी चौकशीची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -