घरदेश-विदेश'राफेलची किंमत बालवाडीच्या मुलालाही कळेल, पण राहुल गांधींना कळत नाही'

‘राफेलची किंमत बालवाडीच्या मुलालाही कळेल, पण राहुल गांधींना कळत नाही’

Subscribe

सध्या लोकसभेत राफेल करारावरुन मोठा गोंधळ सुरु आहे. राफेल करारासंबंधी राहुल गांधी यांनी संसदेत आक्रमक असे भाषण केले. त्यानंतर केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्याच त्वेषाने राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले.

राफेल करारावरुन देशातील राजकीय वातावरण चांगलच पेटताना दिसत आहे. बुधवारी संसदेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारला राफेल करारावरुन प्रश्न विचारला. या प्रश्नाला प्रत्युत्तर देताना अरुण जेटली यांनी राहुल गांधींना फटकारलं. राफेलची किंमत बालवाडीच्या मुलाला कळेल, पण राहुल गांधी यांना कळत नाही, अशा शब्दात जेटली यांनी राहुल गांधाींवर टीका केली. त्याचबरोबर राहुल गांधी खोटे बोलत आहे. त्यांचे प्रत्येक वाक्य कोर्टाचा अवमान करत असल्याचे जेटली म्हणाले आहेत.

हेही वाचा – ‘मनोहर पर्रिकर यांच्या बेडरुममध्ये राफेल घोटाळ्याचे रहस्य’

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले जेटली?

सध्या राफेल करारावरुन संसदेत गोंधळ सुरु आहे. राफेल करारावर संशय घेऊन यात घोटाळा झाला असल्याचे राहुल गांधी यांनी संसदेत म्हटले आहे. या कराराच्या किंमतीविषयी देखील त्यांनी प्रश्न विचारले आहेत. या करारासंबंधी त्यांनी संसदेत आक्रमक भाषण केले. त्यांच्या या भाषणानंतर अरुण जेटली यांनी देखील त्याच त्वेषाने त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. जो पक्ष अनेक दिग्गजांनी चालवला, त्या पक्षाच्या अध्यक्षांना कॉम्बॅट एअरक्राफ्ट काय असतं हे माहित नाही. ते म्हणाले की, हे या देशाचे दुर्देव आहे की, देशातील काही लोकांना आणि कुटुंबांना देशाच्या सुरक्षेविषयी काही घेणं देणं नाही. राफेल घोटाळ्याची किंमत बालवाडीच्या मुलालाही कळेल, पण ते राहुल गांधींना कळत नाही, असे अरुण जेटली म्हणाले आहेत. त्याचबरोबर राफेल, बोफर्स, नॅशनल हेरॉल्ड आणि ऑगस्टा वेस्टलँड सारख्या घोटाळ्यांकडे ज्यांच्यावर आरोप केले गेले आहे ते आज राफेलवर संशय घेत आहेत, असा टोला देखील जेटली यांनी राहुल गांधींना लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – काँग्रेसचा खोटारडेपणा जाहीर; पर्रिकरांचे सडेतोड उत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -