घरताज्या घडामोडीCoronavirus: राहूल गांधींनी सरकारला आधीच केलं होतं सावध

Coronavirus: राहूल गांधींनी सरकारला आधीच केलं होतं सावध

Subscribe

राहूल गांधींनी १२ फेब्रुवारीला ट्विट करत सरकारला सावध केले होते.

देशात करोना विषाणू वेगाने पसरत आहे. यामुळे सर्व क्षेत्राला याचा फटका बसला आहे. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासाळत आहे. महाराष्ट्रासह सर्वच राज्यात करोनाग्रस्तांची संख्येत वाढ होत आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अद्याप सरकारला यश आलेले नाही. मात्र, ही परिस्थिती रोखता आली असती जर राहुल गांधींचे आधीच ऐकले असते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला करानाबाबत आधीच सावध केले होते. मात्र, त्यांचा सल्ला गांभीर्याने न घेता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.


हेही वाचा – आता सर्व राज्यात लॉकडाऊन!

देशभरात थैमान घातलेल्या करोनाने काही दिवसांपूर्वी देशात शिरकाव केला. देशातील करोनाग्रस्तांची संख्या वाढत जात आहे. देशातील अनेक राज्यात लॉकडाउन करण्यात आले आहे. करोनाचा संसर्ग देशात वेगाने पसरत आहे. देशात हातपाय पसरणाऱ्या करोनाला आपण रोखू शकलो असतो जर राहुल गांधी यांच्या सल्ल्याकडे गांभीर्याने पाहिले असते. राहूल गांधी यांनी तीन ट्विट करत सरकारला सावध केले होते.

- Advertisement -

राहुल गांधींनी दिला होता इशारा

राहुल गांधी यांनी सर्वप्रथम १२ फेब्रुवारीला ट्विट करत सरकारला सावध केले होते. “भारतातील लोकांसाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेला करोना विषाणूचा गंभीर धोका आहे. केंद्र सरकार हा धोका गांभीर्याने घेतना दिसत नाही, असे मला वाटते. वेळेवर उपाययोजना करणे गरजेचे आहे,” असा सावध इशारा राहुल गांधींनी दिला होता.

- Advertisement -

त्यानंतर राहुल गांधी यांनी ३ मार्च रोजी ट्विट करत पुन्हा एकदा सावध केले होते. “प्रत्येक राष्ट्राच्या आयुष्यात असे काही क्षण येतात, जेव्हा त्या राष्ट्राच्या नेत्याची परीक्षा घेतली जाते. एक प्रामाणिक नेता भारत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा करोना विषाणूच्या मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी पूर्णपणे लक्ष्य केंद्रीत करेल,’ असे ट्विट राहुल गांधींनी केले होते.

दरम्यान, राहुल गांधींनी ५ मार्च रोजी ट्विट करत संकाटाचा मुकाबला करण्यासाठी सरकारने काही योजनांची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे, असे सरकारला उद्देशून म्हटले होते. त्यांनी ट्विटमध्ये , “देशाचे आरोग्यमंत्री सांगत आहेत की, करोना व्हायरसचे संकट पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणात आहे. हे म्हणजे टायटॅनिक जहाजाच्या कॅप्टनने जहाजातील प्रवाशांना घाबरू नका, जहाज बुडणार नाही, असे सांगण्यासारखे आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -