घरताज्या घडामोडीRahul Gandhi Twitter : ट्विटरवर सरकारी नियंत्रण, राहुल गांधींचे नव्या फॉलोअर्सच्या संख्येवरून...

Rahul Gandhi Twitter : ट्विटरवर सरकारी नियंत्रण, राहुल गांधींचे नव्या फॉलोअर्सच्या संख्येवरून कंपनीला पत्र

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नव्या फॉलोअर्सची संख्या घटल्यामुळे त्यांनी ट्विटरला पत्र लिहिलं आहे. नव्या फॉलोअर्सला राहुल गांधी यांची प्रोफाईल दाखवण्यात येत नाही. हे सर्व मोदी सरकारच्या दबावामुळे सुरू असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच नव्या फॉलोअर्ची संख्या घटल्याचं ट्विटरच्या निदर्शनास त्यांनी आणून दिलं आहे. भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्याचं काम करण्यात आल्याचं पत्र राहुल गांधी यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहिलं.

नव्या फॉलोअर्सची संख्या कमी झाल्याचा आरोप

ट्विटरला नव्या फॉलोअर्सची संख्या घटल्याचं ट्विटरच्या निदर्शनास आणून दिलं आहे. सुरूवातीला दरमहा राहुल गांधी यांच्या ट्विटरला फॉलो करणाऱ्यांची संख्या दरमहा २.३ लाख इतकी होती. परंतु ती ६.५ लाखांवर पोहोचली होती. मात्र, ऑगस्ट २०२१ नंतर ती संख्या दरमहा अडीच हजारांवर आली आहे. त्यामुळे त्या काळात १९.५ दशलक्ष फॉलोअर्स गोठवण्यात आल्याची तक्रार राहुल गांधींनी ट्विटरला केली आहे.

- Advertisement -

राहुल गांधींच्या पत्रावर कंपनीचं प्रत्यूत्तर

राहुल गांधींच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या कमी झाल्यानंतर त्यांच्या पत्राला ट्विटरने प्रत्यूत्तर दिलंय. ट्विटरच्या प्रवक्त्याने म्हटलंय की, फॉलोअर्सची संख्या अर्थपूर्ण आणि अचूक आहे. यावर प्रत्येकाने विश्वास ठेवावा अशी आमची इच्छा आहे. ट्विटर आपल्या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारचा फेरफार करत नाही. स्पॅमिंगसाठी आमच्या धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल प्रत्येक आठवड्याला लाखोंपर्यंत खाती काढून टाकता येतात, असं प्रवक्त्याने म्हटलं आहे.

- Advertisement -

आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न

ट्विटर इंडिया वरती सरकारद्वारे माझा आवाज दाबवण्यासाठी अत्याधिक दबाव टाकण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. भारतातील हुकूमशाही वाढण्यास ट्विटर सक्रियपणे मदत करत नाही, यासंदर्भात खात्री करणं ही तुमची मोठी जबाबदारी आहे, असं राहुल गांधींनी म्हटलंय.

८ दिवसांसाठी बंद होतं ट्विटर

एप्रिल २०१५ पासून राहुल गांधी ट्विटरचा वापर करत आहेत. सध्याच्या घडीला त्यांच्याकडे १९.६ मिलियन फोलोअर्स आहेत. मागील वर्षात ऑगस्ट महिन्यात राहुल गांधींचं ट्विटर अकाऊंट ८ दिवसांसाठी बंद होतं. पीडित तरूणीच्या बलात्कारसंबंधी प्रकरणात त्यांनी फोटो ट्विट केला होता. त्यावेळी त्यांचे ट्विटर बंद करण्यात आले होते. परंतु समंतीपत्र मिळाल्यानंतर त्यांचे अकाऊंट पुन्हा एकदा सुरू करण्यात आले होते.


हेही वाचा : Share market : शेअर मार्केटमध्ये पडझडीचं वादळ ; सेन्सेक्समध्ये १ हजार अंकांची घसरण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -