घरताज्या घडामोडीमालेगाव कॉंग्रेसला खिंडार, आमचे थोडेफार नेलेत, तर आमच्याकडे..., नाना पटोलेंचे वक्तव्य

मालेगाव कॉंग्रेसला खिंडार, आमचे थोडेफार नेलेत, तर आमच्याकडे…, नाना पटोलेंचे वक्तव्य

Subscribe

मालेगाव कॉंग्रेसच्या २८ नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत केला. त्यामध्ये महापौरांचाही समावेश आहे. माजी आमदार रशीद शेख यांच्या नेतृत्वात मालेगावमध्ये कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले. या विषयावर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनीही शेख यांचा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया दिली. कॉंग्रेस नगरसेवकांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशावर आता कॉंग्रेसकडूनही प्रतिक्रिया आली आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबतच राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या अनुपस्थितीवरही त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

मालेगावमधील कॉंग्रेस नगरसेवकांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशानंतर नाना पटोले म्हणाले की, ”जे काही चाललयं ते मंथनाच काम आहे. त्यांचे लोक आमच्याकडे आले, आमचे लोक त्यांच्याकडे गेले आहेत. त्यांनी आमचे थोडे फार नेलेत तर आमच्याकडेही त्यांचे जास्त लोक येणार आहेत. त्यामुळे याबाबतची नाराजी हा राजकारणातला भाग आहे. त्यामुळे पक्ष प्रवेशाचा विषय फार काही गांभीर्याने घेण्याची गरज नाही,” असे वक्तव्य महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केले. नितीन राऊतांच्या अनुपस्थितीवरही नाना पटोलेंनी खुलासा केला.

- Advertisement -

नितीन राऊतांची गैरहजेरी का ?

महाराष्ट्र कॉंग्रेसच्या बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे गैरहजर राहिले. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, ऊर्जा विभागातील अडचणींचा पाढा त्यांनी पक्षश्रेष्ठींना वाचला आहे. विभागात सुरू असणाऱ्या गैरप्रकारही त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले आहेत. त्यामुळे नाराजी नसल्याचे नाना पटोलेंनी स्पष्ट केले. या बैठकीला ते उपस्थित राहणे अपेक्षितही नव्हते, हादेखील खुलासा त्यांनी केला.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -