घरदेश-विदेशदिल्ली विमानतळावर पहिल्यांदा दिसली 'शार्क'

दिल्ली विमानतळावर पहिल्यांदा दिसली ‘शार्क’

Subscribe

एंब्रायर (Embraer) कंपनीने आपले दुसरी विमान E-2 नुकतेच लॉन्च केले आहे. हे विमान काल दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. शार्क माशासारखे दिसणारे हे विमान पहिल्यांदाच दिल्ली विमानतळावर दिसले.

साधारणतः ९० टक्के प्रवासी विमानात पांढऱ्या रंगाचा वापर केला जातो. मात्र बदलत्या काला बरोबर विमानांमध्येही नवीन डिझाईन्स बघायला मिळत आहेत. एंब्रायर (Embraer) कंपनीने प्रवासी विमानावर चक्क प्राण्यांच्या चित्रांनी रंगवले आहे. असेच एक विमान काल दिल्ली विमातळावर उतरले. विमानावर शार्क मास्याचे चित्र असल्यामुळे हा एक मोठा शार्क मासा असल्याचे भासत होते. विमाच्या तोंडावर शार्क मास्याचे चित्र असल्याने ते बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. दिल्ली विमानतळावर अशा प्रकारचे विमान पहिल्यांदाच उतरवले होते. दिल्ली विमानतळ अधिकाऱ्यांनी याचा फोटो दिल्ली विमानतळाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंना लोकांचा चांगला प्रतिसात दिला आहे.

विविध डिझाईन्सची विमाने

एंब्रायर (Embraer) कंपनीने शार्क व्यतिरिक्त इतर प्राण्यांचे चित्र विमाानांवर काढले आहेत. मोठ्या विमानांना अशा प्रकारे रंगवून या विमानांनी सर्व सामान्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शार्क,गरूड आणि वाघ यांच्या चित्रांनी विमाने रंगवली आहेत.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -