घरदेश-विदेशRajya Sabha: राज्यसभेत कोणाची किती ताकद? निवडणूक प्रक्रियेनंतर चित्र स्पष्ट

Rajya Sabha: राज्यसभेत कोणाची किती ताकद? निवडणूक प्रक्रियेनंतर चित्र स्पष्ट

Subscribe

राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. 27 फेब्रुवारी रोजी तीन राज्यांतील 15 राज्यसभेच्या जागांसाठी मतदान झाले. यामध्ये उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 10, कर्नाटकात चार आणि हिमाचल प्रदेशात एका जागेसाठी निवडणूक झाली.क्रॉस व्होटिंगमुळे हिमाचल आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. 12 राज्यांतील 41 उमेदवार राज्यसभेवर यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.

नवी दिल्ली : राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. 27 फेब्रुवारी रोजी तीन राज्यांतील 15 राज्यसभेच्या जागांसाठी मतदान झाले. यामध्ये उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 10, कर्नाटकात चार आणि हिमाचल प्रदेशात एका जागेसाठी निवडणूक झाली.क्रॉस व्होटिंगमुळे हिमाचल आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. 12 राज्यांतील 41 उमेदवार राज्यसभेवर यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजप अध्यक्ष जेपी नड्डा ते काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा समावेश आहे. (Rajya Sabha How much power in Rajya Sabha The picture is clear after the election process)

निवडणुकीनंतर राज्यसभेतील कोणत्या पक्षाच्या स्थितीत काय बदल झाले ते जाणून घेऊया? कोणत्या पक्षांनी आपल्या जागा वाढविल्या आणि कुठे घट झाली? भाजपने स्वबळावर राज्यसभा सभागृहात बहुमताचा आकडा गाठला आहे का? हे जाणून घेऊया.

- Advertisement -

कार्यकाळ संपल्यामुळे निवडणूक

15 राज्यांमधील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया आता संपली आहे. यापैकी 13 राज्यांतील 50 जागांवर विद्यमान खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे. त्याचवेळी दोन राज्यांतील पाच खासदारांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपत आहे. तर, राजस्थानचे राज्यसभा खासदार किरोरी लाल मीना यांचा कार्यकाळही 3 एप्रिल रोजी संपणार होता, मात्र मीना यांनी आधीच राजीनामा दिला आहे. त्यासाठीच निवडणुका झाल्या. 15 फेब्रुवारी रोजी नामांकन प्रक्रिया पार पडली. त्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्रांच्या छाननीनंतर तीन राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली तर याआधीच. 12 राज्यांतील 41 उमेदवार बिनविरोध राज्यसभेवर निवडून गेले होते.

हेही वाचा : MVA : महाविकास आघाडीचं ठरलं; जागावाटपाची अधिकृत घोषणा लवकरच

- Advertisement -

भाजपचे दोनने वाढ तर काँग्रेसची एकने घट

भाजपचे 20 उमेदवार बिनविरोध निवडून आले. उत्तर प्रदेशात पक्षाचे आठही उमेदवार निवडणुकीत विजयी झाले. हिमाचल प्रदेशात संख्याबळ नसतानाही पक्षाचे उमेदवार हर्ष महाजन यांनी विजयाची नोंद केली. तर कर्नाटकातही पक्षाचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे भाजपच्या जागांची संख्या 30 वर पोहोचली आहे. अशा स्थितीत पक्षाचे संख्याबळ दोन जागांनी वाढले आहे. तर काँग्रेसचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले. कर्नाटकमध्ये पक्षाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील जागांची संख्या नऊ झाली आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांचा क्रॉस व्होटिंगमुळे पराभव झाला. काँग्रेसचे 10 खासदार निवृत्त होत आहेत. अशा स्थितीत पक्षाचे संख्याबळ एकाने घटले आहे हे विशेष.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -