घरपालघरभंगाराच्या गोडाऊनसह ५० ते ६० झोपड्या जळून खाक

भंगाराच्या गोडाऊनसह ५० ते ६० झोपड्या जळून खाक

Subscribe

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार चार लोक गंभीर जखमी आहेत. मात्र जीवितहानी झालेली नाही. मात्र कोट्यवधीचे नुकसान झालेले आहे.

भाईंदर :- भाईंदर पूर्वेच्या आझाद नगर परिसरात भंगाराच्या गोडाऊन आणि झोपडपट्टी लागलेल्या आगीत जवळपास असलेल्या ५० ते ६० झोपड्या आणि दुकाने जळून खाक झाली आहेत. तर ही आग इतकी भीषण आहे की, पहाटे साडेचार वाजेपासूनच लागलेली आग सकाळी साडेआठ पर्यंतही नियंत्रणात येत नव्हती. दुर्दैवाने या आगीत एकाचा मृत्यू आहे.पप्पू चौरसिया (वय40) असे त्याचे नाव आहे. पालिकेला आग लागल्याची माहिती मिळताच एक ते दोन बंब घटनास्थळी दाखल करण्यात आला आणि त्यांच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न झाले. स्थानिक नागरिकांनी सांगितल्यानुसार एका दुकानात शॉर्ट सर्किट होऊन लागली होती. त्या भीषण आगीत जवळपास १० गॅस बाटले फुटून ब्लास्ट झाले. त्यानंतर आगीने मोठे रौद्ररूप धारण केले. त्यानंतर ती आग परिसरात सगळीकडे हळूहळू पसरून जवळपास ५० ते ६० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर गॅस बाटल्याचा ब्लास्ट एवढा मोठा होता की, तिथे आग विझवताना स्थानिक नागरिकाचा हात शरीरापासून वेगळा होऊन तुटला असल्याची माहिती मिळत आहे. तर पालिकेच्या अग्निशमन विभागाचे काही कर्मचारी सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार चार लोक गंभीर जखमी आहेत. मात्र जीवितहानी झालेली नाही. मात्र कोट्यवधीचे नुकसान झालेले आहे.

बॉक्स

- Advertisement -

बंबांना पाणी पुरवठा करण्यास मोठी अडचण होत होती. पाणी संपले की स्वतः जाऊन पाणी आणावे लागत होते. त्यानंतर सहा वाजल्यानंतर त्याठिकाणी अजून दोन अशा मिळून चार बंब गाड्या आणण्यात आल्या आणि टँकरही पाणी पुरवठा करण्यास सुरू झाल्याने साडेआठच्या दरम्यान सदरील आग चार ते साडेचार तासानंतर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -