घरताज्या घडामोडीCoronaVirus: राष्ट्रपती भवनातील सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण!

CoronaVirus: राष्ट्रपती भवनातील सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण!

Subscribe

भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आता कोरोना व्हायरस राष्ट्रपती भवनातील परिसरात पोहोचला आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, राष्ट्रपती भवनातील सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. या सफाई कर्मचाऱ्याचा अहवाला पॉझिटिव्ह आल्यामुळे १२५ जणांना सेल्फ आयासोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

देशातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत नाही आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळावारी जारी केलेल्या आकडेवारी नुसार, आतापर्यंत ५९० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसंच १८ हजार ६०१ वर कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत देशात १ हजार ३३६ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून ४७ लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे ३ हजार २५२ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत.

देशातील आतापर्यंत दोन राज्य कोरोनामुक्त झाले आहे. रविवारी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात एक कोरोनाचा रुग्ण नसल्याची माहिती दिली. तर सोमवारी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दोन कोरोनाचे रुग्ण बरे झाल्याची माहिती दिली.

- Advertisement -

जगभरातील कोरोनाग्रस्तांचा संख्या वाढताना दिसत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या २४ लाख ८९ हजार ६६० वर पोहोचली आहे. त्यापैकी १ लाख ७० हजार ८६६ जणांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन इथे आढळले आहेत. या महामारीमुळे जगातील चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे.


हेही वाचा – CoronaVirus: पुढील दहा दिवसात देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -